पावसाची चाहूल विचारात घेता खरीप हंगामाची लगबग

पावसाची चाहूल विचारात घेता खरीप हंगामाची लगबग

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shievade Vani

शिरवाडे वणी (Shievade Vani) परिसरात खरिपाची (kharip season) पेरणीपूर्व हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून परिसरात टोमॅटो लागवडीस प्रारंभ झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून बळीराजाला पावसाची चाहूल लागल्याने खरीप हंगामातील (kharip season) पिके (crop) घेण्यासाठी पूर्वतयारी जवळजवळ पूर्ण झाली असल्याचे दिसून येत आहे.

खरीप हंगामात टोमॅटोचे पीक महत्वाचे मानले जात असून सद्यस्थितीत टोमॅटो चांगलाच भाव खाऊ लागल्यामुळे शेतकरी (farmers) वर्ग टोमॅटो पिकाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाले आहे. मागील वर्षी पहिल्या टप्प्यात टोमॅटोचे दर कमी राहिल्यामुळे यावर्षी लागवडीच्या प्रमाणात घट होण्याची चिन्हे दिसत असताना गेल्या महिनाभरापासून टोमॅटोच्या भावाने उच्चांक गाठल्यामुळे टोमॅटो लागवडीसाठी शेतीसाठी लागणारे साहित्य जमा करण्यात शेतकरीवर्ग मग्न झाला आहे. परिणामी यावर्षी टोमॅटो लागवडीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.

साहजिकच टोमॅटो लागवडीसाठी लागणार्‍या मल्चिंग पेपर (Mulching paper), ठिबक सिंचन (Drip irrigation) रोपे यांचे भाव वाढवून देण्यात आले आहे, असे असले तरी पिके जोमात येण्यासाठी पाण्याचे नियोजन मात्र चांगले होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत विविध ठिकाणी विहिरींना पाणी कमी असल्यामुळे तसेच पावसाचा अंदाज (Rainfall forecast) यावर्षी वारंवार बदलत असून खरिपाची लागवड करण्यासाठी पावसाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते. टोमॅटोचे पीक (Tomato crop) घेताना ऐनवेळी अस्मानी, सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. परंतु लागवडीचे प्रमाण किती कमी अथवा जास्त झाले तरी निसर्गावरच या गोष्टी अवलंबून असणार आहे.

कधी कधी नैसर्गिक आपत्ती (Natural disasters), बनावट बियाण्यांचा फटका शेतकरी (farmers) वर्गाला सहन करावा लागतो. रोपवाटिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत असून गेल्या महिनाभरापासून रोपांची आगाऊ रक्कम जमा करून नोंदणी करण्यात आली आहे. रोपांची लागवड केल्यानंतर अडीच महिन्यानंतर बनावट बियाणांचा परिणाम पिकावर दिसून येत असल्यामुळे तोपर्यंत सर्व खर्च वाया जात असतो. लागवडीसाठी कमी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे परिसरात खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी सुरुवात झाली असल्यामुळे टोमॅटो लागवडीला प्रारंभ झाला असून शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त झाल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com