नाशिक । Nashik

नाशिक येथे 25 मार्च ते 28 मार्च दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यासाठी राज्यभरातून साहित्यप्रेमी येणार असून याचा फायदा घेत ओबीसींसाठी सुरू करण्यात आलेल्या महाज्योती योजनेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी होऊ शकतो.

यामुळे संमेलनापुर्वी नाशिक येथील उपमुख्य कार्यालय सुरू करावे असे साकडे समता परिषदेच्या वतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना घालण्यात आले आहे.

याबाबत भुजबळ यांची भेट घेऊन समता परिषदेचे कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर व पदाधिकार्यांनी निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसी भटक्या जाती , विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग यासाठी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) ही संस्था निर्माण झाली आहे, शासनानी महाज्योतीसह विविध योजना ओबीसी प्रवर्गासाठी सुरु केल्या आहेत.

वर्तमानपत्रात याबाबत जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप अपेक्षीत व लक्ष्यांक इतका प्रतिसाद मिळालेला नाही. 7 जानेवारीच्या महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये नाशिक येथे महाज्योतीचे उप मुख्यकार्यालय, स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार नाशिकमध्ये हे कार्यालय तात्काळ सुरू करण्याची आवश्यकता आहे.

नाशिक येथे 24 मार्च ते 26 मार्च या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातील लक्षावधी साहित्यप्रेमी नागरीक येणार आहेत . महाज्योतीच्या प्रचार व प्रसारासाठी ही योग्य संधी आहे.

त्यामुळे या मराठी साहित्य संमेलनात महाज्योतीचे प्रचार स्टॉल लावुन, तसेच परिसरात जाहीरात व माहितीपर फ्लेक्स लावुन, महाज्योतीच्या योजनांचा प्रसार करणे व ती सर्वांपर्यंत पोहचवणे शक्य होणार आहे. परंतु तत्पुर्वी नाशिक येथे प्राथमिक स्वरुपात महाज्योतीचे उपमुख्यालय सुरु करण्याची आवश्यकता आहे.

येथील सामाजिक न्याय विभागामध्ये महाज्योती कार्यालयासाठी जागा उपलब्ध आहे, परंतु त्यासाठी अजुनही कार्यवाही सुरु झालेली नाही. यामुळे यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती करण्यात आली आहे.

योजनेच्या प्रचाराची संधी

शासनाने महाज्योती योजनेद्वारे ओबीसी विद्यार्थी व सर्व घटकांसाठी महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत. यामध्ये स्पर्धा परिक्षांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण, विमान पायलट प्रशिक्षणासाठी मदत, विविध शिष्यवृत्ती योजना, ग्रंथालये, उद्योग व व्यावसायिक प्रशिक्षण यासाठी मोठी तरतुद केली आहे.

मात्र याबाबत ओबीसी समाजातील बहूतांश नागरीकांना या योजनेची पुरेसी माहिती नाही. नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या योजनेच्या प्रचार व प्रसाराची संधी असून येथे राज्यभरातून येणारे साहित्य प्रेमी आपआपल्या भागात या योजनेचा प्रसार करतील यामुळे महाज्योतीचा स्टॉल लाऊन या संधीचा फायदा घेता येईल.

- समाधान जेजुरकर, कार्याध्यक्ष समता परिषद