इंडिगो एअरलाइन्स तर्फे विमानसेवा सुरू करावी; आयमाचे आवाहन

इंडिगो एअरलाइन्स तर्फे विमानसेवा सुरू करावी; आयमाचे आवाहन

सातपूर । प्रतिनिधी Satpur

करोनाच्या corona महामारीनंतरच्या काळात रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर नाशिकमधून देशातील विविध राज्यांत व प्रदेशात इंडिगो एअरलाइन्सतर्फे Indigo Airlines विमानसेवेची आवश्यकता जाणवू लागली असून, देश-विदेशाच्या प्रवासासाठी विमानसेवा तातडीने सुरू करण्याचे आवाहन आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार Arun Talwar- AIMA यांनी इंडिगो विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केले.

अंबड औद्योगिक वसाहतीतील आयमा रिक्रिएशन सेंटर AIMA Recreation Center येथील के. आर. बूब सभागृहात विमानसेवा सुरू करण्याबाबत आयमा व इंडिगो एअरलाइन्सचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत इंडिगो एअरलाइन्सचे जाजू, लठू यांच्यासमवेत आयमा अध्यक्ष वरुण तलवार, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, उन्मेष कुलकर्णी, आयपीपी राजेंद्र अहिरे, बीओपीपी चेअरमन धनंजय बेळे, एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल यांनी चर्चा केली.

नाशिकमधून सुरू करण्यासाठी आयमा पदाधिकार्‍यांनी इंडिगो एअरलाइन्सच्या पदाधिकार्‍यांना त्याची उपयुक्तता अधोरेखित केली. यावेळी नाशिकमधून इंडिगो एअरलाइन्स राज्यात व देशाच्या विविध भागांत विमानसेवा सुरू करण्यास सकारात्मक असल्याचे इंडिगो एअरलाइन्सचे व्यवस्थापक गौरव जाजू, मॅनेजर कॉर्पोरेट सेल्स शशांक लठू यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com