घरपोच सातबारा उतारा देण्यास प्रारंभ

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महसूल विभागाचा उपक्रम
घरपोच सातबारा उतारा देण्यास प्रारंभ

निफाड। प्रतिनिधी Niphad

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (Amrit Mahotsavi Varsha) राज्याच्या महसूल विभागाने (Department of Revenue) शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यामध्ये (7/12 Utara) अमुलाग्र बदल करून शेतकर्‍यांना तो सहजगत्या समजेल इतक्या सोप्या व डिजिटल पद्धतीने (Digital methods) तयार केला आहे.

सुधारित पद्धतीचा सात-बारा उतारा शेतकर्‍यांना (Farmers) घरपोच देण्याचा शुभारंभ निफाड (Niphad) सोसायटीच्या मुख्य कार्यालयात गांधी जयंतीच्या (Mahatma Gandhi Jayanti) निमित्ताने करण्यात आला.

चालू वर्षे हे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीतील शेतकर्‍यांचे योगदान विचारात घेऊन महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंती दिनापासून डिजिटल सातबारा उतारा (Digital Satbara Utara) शेतकर्‍यांना मोफत देण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला असून याचा शुभारंभ निफाड सोसायटीच्या मुख्य कार्यालयात करण्यात आला आहे.

यावेळी निफाड सोसायटी चेअरमन रमेश जाधव, व्हॉ. चेअरमन बापूसाहेब कुंदे, नगरसेवक अनिल कुंदे, संचालक किसन कुंदे, सुरेश कापसे, सदाशिव धारराव, सुभाष गाजरे, भाऊसाहेब कापसे, सिताराम बागडे, संपत व्यवहारे, सिंधूताई धारराव, भारती कापसे, शिवाजी ढेपले, नामदेव कापसे, निवृत्ती राऊत, ज्ञानेश्वर खालकर, कैलास कुंदे, सुरेश खालकर, सुरेश जाधव, कामगार तलाठी शंकर खडांगळे, संस्थेचे मुख्य सचिव विठ्ठल कोटकर, गणेश वाघ आदींसह संस्थेचे सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कारसूळला घरपोहच सातबारा

महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) महसूल व वनविभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्ताने मोफत सुधारित सातबारा वितरणाचा कार्यक्रम हा महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी कारसूळ येथे शेतकर्‍यांना मोफत सातबारा वितरण करण्याचा कार्यक्रम तलाठी कार्यालयात आयोजित केला होता.

तहसीलदार शरद घोरपडे व पालखेडच्या मंडल अधिकारी शितल कुयटे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शेतकर्‍यांना शासनाच्या आदेशानुसार मोफत सातबारा उतारे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकरी चंद्रभान गाडे, सोपान पगार, हनुमंत शंखपाळ, जयराम जाधव, काशिनाथ ताकाटे, भगवंत ताकाटे, बाळासाहेब ताकाटे, ज्ञानेश्वर ताकाटे, श्रीराम शंखपाळ, दत्तात्रय शंखपाळ, दौलत जाधव, योगेश काजळे, हनुमंत जाधव, देविदास काजळे, सुरेश शंखपाळ, नितीन जाधव, संभाजी वाघ, रामनाथ पगार, संतोष काजळे, एकनाथ पेरणे, भाऊराव कंक, लक्ष्मण भडांगे, सुहास शंखपाळ, सचिन उगले उपस्थित होते.

लासलगावला सातबारा वितरण

लासलगाव (Lasalgaon) येथील तलाठी कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोफत शेती सातबारा वितरण (Distribution of free agriculture seventeen) करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जि.प. सदस्य डी.के. जगताप, लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, ग्रा.पं. सदस्य अमोल थोरे, दत्ता पाटील यांचे हस्ते सातबारा वितरण करण्यात आले.

सर्व शेतकरी खातेदारांनी आपला सातबारा तपासून त्यामध्ये काही त्रुटी अथवा विसंगती असल्यास लासलगाव तलाठी यांचेशी संपर्क साधून त्रुटी निदर्शनास आणून द्याव्यात असे आवाहन तलाठी नितीन केदार यांनी केले आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागाच्या वतीने आज तालुक्याच्या प्रत्येक गावात शासनाच्या वतीने डिजिटल करण्यात आलेल्या सातबारा उतार्‍याचे शेतकर्‍यांना मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे.

निफाड तालुक्यात शासन निर्णयाची अमलबजावणी तातडीने करण्यात येत असून आजपासून 15 नोव्हेंबर पर्यंत सुधारीत व डिजिटल सातबारा उतारा शेतकर्‍यांना मोफत घरपोहच देण्यात येणार आहे. यासाठी आज तालुक्यात प्रत्येक सजेच्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला आहे.

- शरद घोरपडे, तहसीलदार

Related Stories

No stories found.