परीक्षा काळात सिटीलिंक बस फेऱ्या सुरु करा: मनवि सेना

परीक्षा काळात सिटीलिंक बस फेऱ्या सुरु करा: मनवि सेना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी काळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व इतर मंडळांच्या शालांत (shcool) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) अशा दोन्ही परीक्षा (exam) नियोजित आहे.

परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना (students) तणावमुक्तरीत्या परीक्षा केंद्रांवर जाण्या-येण्यासाठी परीक्षांच्या वेळांत शहरातील सर्वच विद्यालये व महाविद्यालयांसाठी सिटीलिंकच्या (Citylink) विशेष बसफेऱ्या (bus) सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) वतीने करण्यात आली आहे. सिटी लिंकच्या अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन (memorandum) देण्यात आले आहे. दरम्यान अनेक वेळा सिटीलिंकच्या बसफेऱ्या ऐनवेळेस विविध कारणांनी रद्द करण्यात येतात.

ऐन परीक्षांच्या वेळेत बसफेऱ्या रद्द केल्यास विद्यार्थ्यांना व पालकांना प्रचंड मनःस्तापास सामोरे जावे लागू शकते. परीक्षाकाळात ऐनवेळेस बसफेऱ्या रद्द न करता बसफेऱ्यांचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संदीप भवर, उमेश भोई, शशिकांत चौधरी, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, कौशल पाटील, मनोज गोवर्धने, शहराध्यक्ष संदेश जगताप, ललित वाघ, नितीन धानापुणे, शुभम थोरात आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com