मका, ज्वारी खरेदी सुरू करा : खा.डॉ.पवार

मका, ज्वारी खरेदी सुरू करा : खा.डॉ.पवार

नाशिक । प्रतिनिधी

शेतकर्‍यांनी नोंदणी केलेल्या मका व ज्वारीची खरेदी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यातील मका व ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांनी पिकांची खरेदी करण्याकरता नोंदणी केली आहे. सदर पिकांची खरेदी सुरू करण्याकरता शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात मागणी होत असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी तातडीने मका व ज्वारीची खरेदी सुरू करण्याची विनंती केली आहे.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. पवार यांनी केंद्राने मका व ज्वारीच्या खरेदीस परवानगी दिली असतानादेखील अद्याप राज्याने खरेदीस परवानगी दिली नसल्याने खा. डॉ. पवार यांनी तातडीने खरेदी करण्याची विनंती पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com