नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

राज्यात अनेक शेतकऱ्यांची मका अजूनही विक्रीअभावी मोठया प्रमाणात शिल्लक असल्याने ते चिंतीत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी मका खरेदीची मुदत अजून वाढवून मिळावी,अशी मागणी केली आहे.त्यानुसार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधून त्यांना शेतकऱ्यांकडे राहिलेली मका खरेदी करावी,अशी मागणी आपण पत्राद्वारे केली असल्याची माहिती खा. डॉ. भारती पवार यांनी दिली. 7 केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत राज्यात ठिकठिकाणी मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ही खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे .त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांची मका खरेदी केली गेली आहे.

परंतु, मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मका खरेदीचे पोर्टल बंद झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची मका अजूनही मोठया प्रमाणात शिल्लक असल्याने ते चिंतीत आहे.

शेतकऱ्यांनी मका खरेदीची मुदत अजून वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यानुसार तातडीने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचेशी संपर्क साधून त्यांना शेतकऱ्यांकडे राहिलेली मका खरेदी करावी असे पत्र दिले आहे.

त्यांनीही या मका खरेदीसाठी सकारात्मकता दाखवली असून राज्य सरकारने जर अधिक मका खरेदी करण्यासाठी मागणी केली तर त्याला केंद्राकडून मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन आपल्याला दिल्याचे खा. डॉ. भारती पवार यांना सांगितले. महाराष्ट्र सरकारला विनंतीआता राज्य सरकारने मका खरेदीसाठी केंद्राकडे लवकरात लवकर पत्रव्यवहार करावा.

जेणेकरून राहिलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी करून त्यांना दिलासा मिळेल, अशी विनंती खा. डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे.