औद्योगिक प्रकल्प सुरू करा

खा. शरद पवारांना माजी आ. चव्हाण यांचे साकडे
औद्योगिक प्रकल्प सुरू करा

डांगसौंदाणे । वार्ताहर Dangsaundane

बागलाणच्या (baglan) औद्योगिक विकासाला (Industrial development) चालना देण्याची गरज आहे. यासाठी आपण स्वतः लक्ष घालून या ठिकाणी मोठे प्रकल्प आणावेत असे साकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार (sharad pawar) यांना घातले असल्याची माहिती बागलाणच्या माजी आ. दीपिका चव्हाण (former mla dipika chavan) यांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार हे नुकतेच नाशिक (nashik) दौर्‍यावर आले असतांना त्यांची माजी आ. चव्हाण यांनी भेट घेत औद्योगिक प्रकल्प (Industrial project) कार्यन्वित करण्याची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर निवेदन (memorandam) खा. पवार यांना दिले असता बागलाणच्या औद्योगिक विकासासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचा शब्द त्यांनी दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

शेती हाच प्रमुख व्यवसाय असलेल्या बागलाण तालुक्यातील बहुतांश तरुण हा नोकरीच्या शोधात मुंबई (mumbai), पुणे (pune) सह अन्य मोठ्या शहरात जाऊन रोजगार शोधत आहे. अनेक तरुणांना रोजगार (employment) नसल्याने तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य निर्माण झाले आहे. रस्ते (road), पाणी (water), वीज (electricity) या सर्व गोष्टी या तालुक्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात.

द्राक्ष, कांदा, डाळिंब, मका, सोयाबीनसारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेणारा हा तालुका असुन याला औद्योगिक विकासाची जोड मिळाल्यास तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होऊ शकते. महाराष्ट्र (maharashtra) आणि गुजरात (gujrat) सीमेवरील या तालुक्याला ऐतिहासिक वारसा आहे. सुरत (surat) व मुंबई ही दोन्ही औद्योगिक शहरे सटाणा (satana) शहरापासून सारख्याच अंतरावर असल्याने दोन राज्यांना जोडणारा हा तालुका आहे.

संपूर्ण तालुक्याला रस्त्यांचे जाळे असुन दळणवळण सुरळीत आहे. शेतीशी निगडित व अन्य औद्योगिक प्रकल्प जर या भागात आले तर आधुनिक शेतीसह रोजगार निर्मिती होऊन स्थानिक जनतेला याचा फायदा होईल. या पूर्वी खमताने येथे ही औद्योगिक विकास महमंडळाला जागा उपलब्ध करून दिली असून ठेंगोडा येथील सुतगिरणीच्या जागेवर ही मोठा प्रकल्प उभा राहू शकतो यासाठी

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) प्रमुख नेते असलेले खा. शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालुन बागलाणच्या विकासाला चालना देण्याची विनंती समक्ष भेटून केली.आपण दिलेल्या निवेदनाची व मागणीची दखल घेत खा. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बागलाणचा औद्योगिक विकास व्हावा या दृष्टीकोनातून आपण स्वत: निश्चित प्रयत्न करू, असा शब्द खा. पवार यांनी आपणांस दिला असल्याची माहिती माजी आ. दिपीका चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com