मका खरेदी के्ंरद सुरु करा

मका खरेदी के्ंरद सुरु करा

तालुक्यातील शेतकर्‍यांची मागणी

पंचाळे। वार्ताहर Panchale

पणन मंडळाने (Marketing Board) आदेश देऊनही तालुका पातळीवरील खरेदी केंद्रांकडून हमीभावाने मका खरेदी केंद्र (Maize Shopping Center) सुरु करण्यास दिरंगाई होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे. हमीभावाचा फायदा होण्यासाठी लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.

शेतकर्‍यांना मका (Maize) व इतर शेती उत्पादनाच्या खर्चावर आधारीत उत्पन्न मिळावे म्हणून केंद्र शासनाकडून (central government) हमीभावाने भरड धान्य खरेदी योजना (Grain purchase plan) राबवली जाते. महाराष्ट्रात (maharashtra) मार्केटिंग फेडरेशनच्या (Marketing Federation) माध्यमातून हमी भावाने मका खरेदी केली जाते. यावर्षी तीन महिन्यांपासून यासाठी फक्त नोंदणीची प्रक्रिया (Registration process) सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील (nashik district) पाच हजार शेतकर्‍यांनी यासाठी नोंदणी केली असून जिल्ह्यात आठ खरेदी केंद्र आहेत.

शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन मका नोंदणीची (Online maize registration) मुदत वाढवण्यात आली आहे व 11 डिसेंबरपासून मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा पातळीवरील अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. जिल्हा पातळीवरील अधिकार्‍यांनी तालुका पातळीवर असणार्‍या खरेदी केंद्रांच्या अधिकार्‍यांना आदेश देऊनही केंद्राच्या व्यवस्थापकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. केवळ शासकीय सोपस्कार करण्यातच धन्यता माणणार्‍या खरेदी विक्री केंद्राच्या अधिकारी व संचालक मंडळाबाबत शेतकर्‍यांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

सिन्नर तालुक्यातही (sinnar taluka) अद्याप खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. केवळ गोडावून ताब्यात घेतले आहे. मात्र, संघाकडे कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने पंधरा दिवसापासून आदेश देऊनही मका खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री शेतकर्‍यांबद्दल कळवळा व्यक्त करणार्‍या संचालकांनी त्वरीत मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com