खुशखबर! स्टार एअरची २ जुलैपासून नाशिकमधून विमानसेवा

खुशखबर! स्टार एअरची २ जुलैपासून नाशिकमधून विमानसेवा

सातपूर | प्रतिनिधी

कोरोनामुळे लावलेले निर्बंध हळूहळू हटविले जात असल्याने येत्या २ जुलैपासून बेळगाव नाशिक विमानसेवा पुन्हा एकदा स्टार एअरकडून दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १ हजार ९९९ रुपयांपासून तिकिटाचे दर ठेवण्यात आले आहेत...

सुरुवातीच्या काळात आठवड्यातून तीन दिवस सोमवार, शुक्रवार आणि रविवारी ही सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विविध राज्यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे प्रवासी संख्या घटून विमानसेवा बंद करण्याची वेळ कंपन्यांवर आली होती. प्रवासी संख्येमुळे व वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिकमध्येही दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, पुणे, बेळगाव, अहमदाबाद साठी नियमित सुरू असलेल्या सेवाही बंद करण्यात आल्या होत्या.

यानंतर परिस्थिती स्थिर होईपर्यंत सेवा स्थगित करण्याचा निर्णय जवळपास सर्वच कंपन्यांनी घेतल्याने अहमदाबादच्या दोन कंपन्यांपैकी केवळ एका कंपनीने सेवा नियमित सुरू ठेवली होती.

उर्वरीत शहरांसाठी सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती सुधारत असताना विमानसेवा जुलै महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

यात मात्र स्टार एअरने आघाडी घेत २ जुलैपासून सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून विमानसेवेसाठी बुकिंगही सुरू केले आहे. आता इतर कंपन्यांकडूनही जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com