Video : सरकार मायबाप आम्ही तर तुमची लेकरं!, एवढ्या वेळी पदरात घ्या...

पक्षघात झालेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीची आर्त हाक
Video : सरकार मायबाप आम्ही तर तुमची लेकरं!, एवढ्या वेळी पदरात घ्या...

पेठ | Peth

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers) संपावर (Strike) आतापर्यंत शासनाकडून समाधानकारक तोडगा निघाला नाही. कर्मचारीदेखील आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने शासनाकडून दबावतंत्राचा वापर करून सक्रिय कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई केली जात असल्याने संप चिघळण्याची स्थिती निर्माण झाली आहे...

पेठ आगारात कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंबीय दोन दिवसांपासून डेपो आवारात ठाण मांडून बसले आहेत. करोना काळापासून एसटी महामंडळ संक्रमण अवस्थेत आले असल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीने ग्रस्त झालेले आहेत. पक्षघात झालेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीनी शासनाला आर्त हाक दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना संपावर तातडीने तोडगा काढण्यासाठी निवेदन दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com