एसटी कामगार संपावर ठाम

आगारात एकत्र येत घेतली शपथ
एसटी कामगार संपावर ठाम

सिन्नर । वार्ताहर Sinnar

येथील एस. टी. बस (S. T. Bus) आगारातील कामगार विलीनीकरणावर (Merger) ठाम असून आगारातील सर्व कामगारांनी एकत्र येत मागे न हटण्याची गुरुवारी (दि.23) शपथ घेतली. जवळपास दोन महिन्यापासून एस. टी. कामगारांनी (S. T. Workers) पुकारलेला संप अजून चिघळत चालला आहे. आगारातील अनेक कामगारांवर निलंबनाची कारवाई (Suspension action) करूनही इतर कामगार आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे दिसत आहे.

यासाठी कामगारांनी आगारात एकत्र येत आंदोलन (agitation) मागे न घेण्यासाठी एकतेची शपथ घेतली. आपण जो लढा उभा केला असून तो विलीनीकरण झाल्याशिवाय थांबणार नाही. विलीनीकरणासाठी ज्या कामगारांनी प्राणाची आहूती दिली त्यांना साक्ष माणून हा लढा पुढे सुरच ठेवण्याचे आवाहन शरद नरोडे यांनी केले. यावेळी प्रकाश पळसकर, गणेश भागवत, कैलास शेळके, कविता चौधरी, नैना भालेराव, उमेश आव्हाड, विशाल पगार, मनोज गोजरे यांच्यासह आगारातील जवळपास 150 महिला व पुरुष कामगार उपस्थित होते.

57 एसटी कामगारांची आत्महत्या

कोरोना काळापासून एस. टी. ची वाताहत सुरु झाल्याने व कमी पगारामुळे राज्यातील 57 एस. टी. कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. यावेळी या कामागारांना आदरांजली देण्यात आली. त्यांचा दुखवटा संपेपर्यंत कुणीही कामगार कामावर येणार नाही, प्रशासनाच्या कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत कुणीही कामावर हजर राहू नये अशी शपथ कामगारांनी घेतली.

दबावाने ह्दयविकाराचा त्रास मागील 56 दिवसांपासून कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे राज्य सरकारकडून कामगारांवर विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे अनेक कामगारांना हद्यविकाराचे त्रास उद्भवत असल्याचे समोर येत असून काहींचा यामुळे मृत्यूही झाला आहे. प्रशासनाकडून दबावतंत्राचा वापर होणे हे चुकीचे आहे.

बाळासाहेब आव्हाड, एस. टी. सेवक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com