एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; पेठ आगारातील घटना

एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; पेठ आगारातील घटना

पेठ | Peth

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers) विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी सुरु असलेल्या संपाने कर्मचारी आर्थिक संकटात तर प्रवाशी हवालदील असा पेच निर्माण झालेला असतानाच संपाचा पेच लवकरच सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे संपकरी आर्थिक ओढाताणीत असल्याचे दिसून येत आहे...

पेठ आगारात सहकाऱ्यांसोबत धरणे आंदोलनात (Agitation) सामील असलेले गहनीनाथ गायकवाड (३३) या चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याच्या प्रकाराने पेठ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबतचे वृत्त असे की, पेठ आगारात चालकपदावर गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत असणारे गहनीनाथ अंबादास गायकवाड (33, मुळ रा. मामावली, ता. आष्टी, जिल्हा बीड, हल्ली सुलभानगर, पेठ) येथे वास्तव्यास असणारे गायकवाड संप सुरु झाल्यापासून सहकारी कर्मचाऱ्यांसोबत धरणे आंदोलनात सामील होते.

आंदोलनादरम्यान घरी गॅस संपल्याचे समजलयाने ते घरी गेले. आर्थिक अडचणीत असलेल्या गायकवाड यांनी त्यांची पत्नी व मुले बाहेरील खोलीत असताना आतील खोलीच्या दरवाजाची आतून कडी लावून गाळफास घेऊन आत्महत्या केली.

बराच वेळ झाला तरी पती बाहेर आले नसल्याने त्यांच्या पत्नीने दरवाजा ठोठावला. मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाऱ्यांच्या सहकार्याने दरवाजा उघडला असता गहनीनाथ यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आले. या घटनेची पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com