एसटीच्या भरतीला पुन्हा थांबा

२ हजार ६८२ चालक- वाहकांचे भवितव्य टांगणीला
एसटीच्या भरतीला पुन्हा थांबा

नाशिक | Nashik

करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २ हजार ६८२ चालक- वाहक भरती प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागला आहे. कराेनासह टाळेबंदीमुळे गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा भरती प्रक्रिया रखडल्याने पात्र चालक- वाहक सेवेत अद्यापही रुजू होऊ शकलेले नाहीत.

एसटीच्या भरतीला पुन्हा थांबा
बिटको तोडफोड प्रकरण: कोण आहेत राजेंद्र ताजणे ? का केला असा प्रकार?

एसटी महामंडळाने सन २०१६-१७ तसेच २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, गेल्या वर्षी अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्याच्या उद्देशाने निवड झालेल्या विविध संवर्गांतील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती.

त्यामध्ये औरंगाबाद (११३), परभणी (१७८), नाशिक (११२) अमरावती (८७), बुलढाणा (४०१), धुळे (२५४), जळगाव (१७३), सोलापूर (३४२), सांगली (१०५), कोल्हापूर (२०७), नागपूर (२३२), भंडारा (५०) चालक कम वाहकांचा समावेश होता.

अनलॉकनंतर एसटी महामंडळाची सेवा पुर्वपदावर येण्यास सुरूवात झाल्यानंतर भरती प्रक्रियेवरील स्थगिती फेब्रुवारी २०२१ मध्ये उठविण्यात आली होती.

आता पुन्हा करोना प्रकोप वाढल्याने तसेच कठोर निर्बंध लागू झाल्याने चालक-वाहकांची भरती प्रक्रिया पुन्हा थांबली आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या व अंतिम चाचणी बाकी असलेले ४७२ चालक-वाहक आणि निवड पूर्ण होऊन प्रशिक्षण सुरू होणारे २ हजार २१० चालक-वाहकांचे भवितव्य टांगणीला लागल्याचे चित्र आहे.

महिला कर्मचाऱ्यांचा समावेश

एसटी महामंडळात २१५ महिला चालक -वाहक म्हणून रुजू होणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण भागांतील १९४ आणि आदिवासी भागातील २१ महिलांचा समावेश आहे. त्यांचे प्रशिक्षण फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाले आहे. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर मुख्य वाहन चाचणी होऊन त्या एसटीच्या सेवेत कार्यरत होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com