एसटी कर्मचाऱ्यांना विमाकवच गरजेचे

कास्ट्राईब रा. प. संघटनेच्या प्रादेशिक मेळाव्यात सूर
एसटी कर्मचाऱ्यांना विमाकवच गरजेचे

नाशिक | Nashik

राज्य कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटनेचा प्रादेशिक मेळावा पंचवटीत उत्साहात मोठ्या उत्साहात पार पडला.

प्रवाशांची थेट संपर्क येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. चालक-वाहकांसह लिपिक तसेच मॅकेनिक सेवा बजावत आहे.

प्रवासादरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रवाशांशी संपर्क होतो. त्यामुळे सर्वच एसटी कर्मचाऱ्यांना विमाकवच आवश्यक असल्याचा सूर मेळाव्यात उमटला.

मेळाव्यात कोरोना काळातील एसटी महामंडळाची स्थितीवर विचारमंथन झाले. प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आंदोलन करण्यावर चर्चा झाली. संघटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवने, कोषाध्यक्ष रवींद्र मांडवे, कार्यकारी सरचिटणीस विजय नंदागवळी, उपाध्यक्ष, वाल्मिक येलेकर, माजी विभागीय सचिव टी. जी. अहिरे, प्रमुख सल्लागार के. के. सोनवणे आदींनी मार्गदर्शन केले. कोरोना संकटातही संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नावार पाठपुरावा करण्यात आल्याचे प्रमुख वक्त्यांनी सांगितले.

यावेळी जनाभाऊ जगताप, रवी निकाळे, टी. के. जाधव, सुधीर खोब्रागडे, संजय मोहिते यांच्यासह सिन्नर, मालेगाव, मनमाड, नांदगाव, पिंपळगाव, सटाणा, विभागिय कार्यशाळा, नाशिक १ आणि नाशिक २ आगारातील पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमाचे पालन परत मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते.

नव्या कार्यकारणीची घोषणा

कास्ट्राईब रा. प. संघटनेच्या नाशिक विभागीय कार्यकारणीचा घोषणा प्रादेशिक मेळाव्यात करण्यात आली. विभागिय अध्यक्षपदी शशिकांत ढेपले (नाशिक-१) तर विभागिय सचिवपदी बाळासाहेब आव्हाड (सिन्नर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तर विभागिय खजिनदारपदी जनाभाऊ जगताप यांची वर्णी लागली. नुतन कार्यकारणीची निवड एकमताने झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com