नाशिक | Nashik

लॉकडाऊन काळातही आपल्या आरोग्याची तमा न बाळगता अखंड सेवा देणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कराेनावरील लस दिली जावी, अशी मागणी पुढे येत आहे. त्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सर्व एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू असे परिवहन राज्यमंत्री ना. सतेज पाटील यांनी स्पष्ट केले

एसटी कर्मचाऱ्यंनी लॉकडाऊन कालावधीत आपल्या आरोग्याची पर्वा न करता कर्तव्य बजावले आहे. परराज्यातील लोकांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचे काम केले आहे.

शिवाय चालक-वाहक वर्गाचा रोज शेकडो प्रवाशांशी संपर्क होत असल्याने इतर वर्गाप्रमाणे सरसकट सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कोविड १९ ची लस देण्यात यावी अशी, मागणी विविध एसटी कर्मचारी संघटनांनी केली.

कर्मचाऱ्यांना सरसकट लस देणे आवश्यक असून त्यासाठी नक्कीच प्रयत्नशील आहे, असे आश्वासन ना. सतेज पाटील यांनी दिले आहे. शिवाय तातडीने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व शासकीय आरोग्य विभाग यांना फोन करून कार्यवाहीसाठी सूचितही केले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कार्यवाही केली जाईल, असेही आश्वस्त केले.

एसटी कर्मचारीही करोनाच्या विळख्यात पडला आहे. आतापर्यंत एकूण ४ हजार २८२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून त्यातील १०९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर ४ हजार ४६ कर्मचारी करोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत.