एसटी कर्मचारी बँक, भविष्य निर्वाह ट्रस्ट अडचणीत

एसटी कर्मचारी बँक, भविष्य निर्वाह ट्रस्ट अडचणीत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एसटी कर्मचार्‍यांच्या (ST employees) संप काळात कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी (Salary) चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रि सदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते.

पण गेले पाच महिने ही रक्कम सरकारकडून अपुरी येत असून एसटी बँक (bank) तसेच भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) व उपदान या दोन्ही ट्रस्टकडे त्यांचा हिस्सा भरण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या रक्कमे वरील व्याज (Interest) बुडत असून या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. एसटी कर्मचारी सभासद असलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑफ बँक (Bank of State Transport Co) आहे. तिचे 87 000 कर्मचारी सभासद आहेत.

या बँकेची सभासदांनी घेतलेल्या कर्ज वसुलीचे (Debt recovery) 120 कोटी रुपये एसटी महामंडळाने (ST Corporation) बँकेकडे भरणा केलेले नाही. बँकने मात्र ही रक्कम कर्जदार डिफॉल्टर होऊ नयेत म्हणून कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केली आहे. त्याचा फटका बँंकेला बसत असून हीच रक्कम बँकेने व्याजाने गुंतवली असती तर त्यावर अंदाजे सव्वा कोटी रुपये पेक्षा जास्त व्याज मिळाले असते. पण ते हीबुडाले असून त्याचा फटका बँकेला बसत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बँक तांत्रिक दृष्ट्या अडचणीत सापडली आहे.

या शिवाय भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) व उपदान या दोन्ही रक्कमांचा एसटी कर्मचार्‍यांचा स्वतंत्र ट्रस्ट असून या साठी कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात केलेल्या रक्कमेचा हिस्सा या ट्रस्टकडे भरणा केला जातो. तो हिस्सा सुद्धा गेले पाच महिने भरणा केला नसून ही रक्कम अंदाजे 650 कोटी रुपये इतकी आहे. ही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्याने गुंतवणुकी नंतर त्या वर मिळणारे अंदाजे बरा ते पंधरा कोटी रुपये इतके व्याज ट्रस्टला मिळालेले नाही.

त्यामुळे या दोन्ही ट्रस्ट सुद्धा अडचणीत सापडल्याचे सांगातले जात आहे. एसटी बँक व दोन्ही ट्रस्ट ह्या संस्था कर्मचार्‍यांच्या असून त्या अडचणीत सापडल्याने कर्मचार्‍यांचे सुद्धा नुकसान होत आहे.या व्यतिरिक्त एसटी कर्मचार्‍यांच्या सहकारी पतसंस्था, ग्राहक भांडार अनेक जिल्ह्यात असून त्याचेही कोट्यवधी रुपयांचे देणे बाकी आहे.

या सर्व प्रकाराला सरकार जबाबदार आहे. महाआघाडीच्या काळात वेतनाची पूर्ण रक्कम सरकारने दिली होती.पण नवे सरकार आल्यापासून एकदाही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com