...तर ९ नोव्हेंबरला आक्रोश आंदोलन

एसटी सेवक आक्रमक
...तर ९ नोव्हेंबरला आक्रोश आंदोलन
‘एसटी बस

नाशिक । Nashik

थकीत वेतन, देय झालेले वेतन, महागाई भत्याची थकबाकी तसेच शासकीय सेवकांप्रमाणे सण उचल मिळावी आदी मागण्यांसाठी एसटी सेवक आक्रमक झाले आहे.

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली येत्या 2 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी व तहसिलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास 9 नोव्हेंबरला एसटी सेवक स्वगृही कुटूंबियांसह आक्रोश आंदोलन करणार आहेत.

लॉकडाउनमध्ये परराज्यातील मजूरांना थेट त्यांच्या राज्यात सोडण्याची कामगिरी एसटीने पार पाडली असून, अत्यावश्यक सेवेतील सेवकांसाठी एसटी धावत आहे.

यामध्ये महामंडळाचे अनेक सेवक करोनाबाधित झालेले असून, 73 सेवकांचा मृत्यू झाला आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानाही सेवकांचे ऑगस्टपासून वेतन रखडलेे आहेे.

दरम्यान, एसटी प्रशासनाने जुलै महिन्याचे वेतन 7 ऑक्टोबरला देताना सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या कामगारांपैकी काही कामगारांचे रजा कालावधीचे वेतन कपात केल्यामुळे एक महिन्याचे वेतनही अल्प प्रमाणात दिलेले आहे.

शासकीय सेवकांना वाढीव 5 टक्के महागाई भत्ता डिसेंबर 2019 देय जानेवारी 2020 च्या वेतनापासून लागू केलेला आहे . मात्र, महागाई भत्ता एसटी कामगारांना अद्याप लागू केलेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

एसटी प्रशासनाने जुलै महिन्याचे वेतन ऑक्टोबरमध्ये दिले असले तरी, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन कामगारांना अद्याप मिळालेले नाही. त्यातच ऑक्टोबर महिन्याचे वेतनही लवकरच देय होणार आहे.

वेतनाअभावी दिवाळी सणावर विरजन पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वीच थकीत वेतन व दिवाळीभेट मिळाल्यास कर्मचार्‍यांना दिलासा मिळेल.

- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com