नाशिकच्या एसटीने भंगारातून कमवले ६ काेटी रूपये

नाशिकच्या एसटीने भंगारातून कमवले ६ काेटी रूपये


नाशिक | Nashik

कालबाह्य (लालपरी) एसटी, मिनीबसेस, लोखंड, ॲल्‍युमिनियम, पत्रे, पाटे, भंगार अशा विविध भागांचा ई-लिलाव एसटी महामंडळाने केला. पंचवटीतील पेठ रोडवरील विभागीय कार्यशाळा येथे झालेल्‍या व स्वत: एसटीने राबवलेल्या ई- लिलावात विक्रमी ६ कोटी ४५ लाख ८० हजार २८४ रूपयांत स्‍क्रॅप विक्री झाले. राज्‍यभरातील विभागांमध्ये झालेल्‍या लिलावांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे.

महामंडळाच्या अधिकृत संकेतस्‍थळावर गव्हर्नमेंट ई-ऑक्शन सिस्टीममध्ये माहिती उपलब्ध करुन दिली होती. कोरोना काळात प्रवासी वाहतुक ठप्प असल्‍याने आर्थिक अडचणीत आलेल्‍या महामंडळाला या लिलावानिमित्त भरघोस रक्‍कम तिजोरीत जमा आहे.

कोरोनाच्‍या प्रादुभावामुळे यावेळी लिलावास विलंब झाला. गेल्‍या वर्षी एप्रिलमध्ये लिलाव झाल्यानंतर साधारण दीड वर्षानंतर एसटी स्क्रॅप आणि लोखंडाचा लिलाव करण्यात आला. दरवर्षीच्‍या तुलनेत यंदा गाड्यांचा आणि सुट्या भागांचा साठा अधिक प्रमाणात असल्‍याने व्‍यापाऱ्यांनी स्क्र‍ॅप मटेरीयअचा लॉट बघण्यासाठी विभागीय कार्यशाळेत गर्दी केली होती.

या लिलावात दोनशे स्क्र‍ॅप बसेस, २० मिनी बसेस, ८५ टन लोखंड, बारा टन ॲल्‍युमिनियम, दोन हजार नग टायर, पाच हजार टन रबर, चारशे नग फ्लाय विल, तीन हजार नग बॅरल आणि छोटे-मोठे गाडीचे ६५ टनाचे सुटे भाग उपलब्‍ध करून दिले होते.

लिलाव घेण्यासाठी विभाग नियंत्रक नितीन मैंद, मुकुंद कुवर, सचिन चाचरे, विश्‍वनाथ भांबर, प्रणय जाधव, प्रदीप बनकर आदी उपस्‍थित होते. गेल्‍या वेळी झालेल्‍या लिलावात नाशिक विभागाला तीन कोटी रूपये मिळाले होते. आता रक्‍कम अदा केल्‍यानंतर व्‍यापारी वर्ग स्‍क्रॅप घेऊन जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com