एसटीला मालवाहतुकीतून तीन कोटीचे उत्त्पन्न

आता दरात दोन रुपयांची भाववाढ
एसटीला मालवाहतुकीतून तीन कोटीचे उत्त्पन्न

नाशिक | Nashik

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (Corona Crisis) प्रवासी संख्या घटली (number of passengers decreased) आहे.

याकरिता एसटी महामंडळाने (ST Corporation) माल वाहतुकीवर (Freight) लक्ष केंद्रीत केले असून २१ मे २०२० ते ३० जून २०२१ या वर्षात नाशिक विभागातील (Nashik Division) माल वाहतूक बसेसने ३ कोटी ६९ लाख रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

यामुळे तोटयात असलेल्या एसटीला (ST Corporation) चांगलाच हातभार लागला आहे. तर डिझेलचे (Diesel Rate) दर वाढल्याने एसटीने देखील मालवाहतूकीच्या दरात दोन रुपयांनी भाव वाढ (Rate Increase) केली आहे.

लॉकडाऊनमुळे (Lockdown) प्रवासी वाहतुकीचे (Numbers Of Passengers) उत्पन्न घटलेले असतांना मालवाहतुकीच्या माध्यामातून एसटीला उत्पन्न (ST Income) वाढण्यास हातभार लागतो आहे. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे.

डिझेल दरवाढीचा मोठा फटका एसटी महामंडळास बसतो आहे. त्यामुळे प्रशासनाने राज्यात दोन रूपये प्रतिकिलोमीटर दरवाढ केली. डिझेल दरातील विक्रमी दरवाढीचा परिणाम आता माल वाहतुकीच्या दरावर होतो आहे.

खासगी ट्रान्सपोर्ट ( Private Transport) महाग झालेले असताना आता एसटी महामंडळानेही प्रतिकिलोमीटर दोन रूपये भाडेवाढ केली आहे. नाशिक विभागात ५० ट्रक सुरू असून, ही भाववाढ इतर ट्रान्सपोर्ट सेवांपेक्षा (Transport Services) आजही स्वस्त असल्याचे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. तसेच खासगी ट्रान्सपोर्ट चालक इंधन दरवाढीबरोबर ट्रान्सपोर्ट दर वाढवतात.

एसटी माल वाहतुकीबाबत तसे होत नाही. आता दोन रूपये दर वाढले असले तरी खासगी ट्रान्सपोर्टच्या तुलनेत ते कमीच असून, मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकार्‍यांनी म्हट्ले आहे. नाशिक विभागात ५० ट्रक माल वाहतुकीचे काम करतात. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. माफक दरात राज्यासह तसेच राज्याबाहेरही बसेसच्या माध्यमातून मालवाहतूक होते.

प्रवासी संख्या घटल्याने एसटी महामंडळाने बसेसमध्ये काही बदल करत त्या बसेस मालवाहतुकीसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com