एस.टी. कर्मचार्‍यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

एस.टी. कर्मचार्‍यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ ही माणुसकी जपणारे दृश्य लासलगाव (lasalgaon) येथे पहावयास मिळाले. गेल्या 90 दिवसापासून एस.टी कर्मचारी (ST staff) संप सुरू आहे. जवळील तुटपुंजी संपली आहे.

कुटुबावर उपासमारीची वेळ आली आहे. एस.टी कर्मचार्‍यांनी जि.प. सदस्य डी.के. जगताप (D.K. Jagtap) व सभापति सुवर्णा जगताप (Chairman Suvarna Jagtap) यांच्याकडे आपली व्यथा मांडली. आपल्या हाताने जर कोणाचे अश्रू पुसता आले. एखादे कुटुंब उपासमारीने पिडले जाऊ नये. माणसातील माणूसपण जपले पाहिजे या माणुसकीच्या नात्याने लासलगाव बस आगारातील सुमारे 26 कर्मचार्‍यांना शिधावाटप करण्यात आले

एसटी कर्मचार्‍यांचा गेल्या अडीच महिन्यापासून सुरु असलेल्या संपामुळे कर्मचार्‍यांच्या घरातील आर्थिक अडचणींचा विचार करून लासलगाव येथील जि.प. सदस्य डी.के. जगताप व लासलगाव बाजार समिती सभापति सुवर्णा जगताप (Lasalgaon Market Committee Chairman Suvarna Jagtap) यांच्या वतीने लासलगाव बस आगारातील सुमारे 26 कर्मचार्‍यांना घरगुती किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी गणेश मंदिर येथे डी.के. जगताप, सुवर्णा जगताप, नामको बँकेचे व्हा. चेअरमन प्रकाश दायमा, भाजप चे संतोष पलोड, राजेंद्र चाफेकर, श्री गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष बापूसाहेब लचके, सुनील सानप, स्मिता कुलकर्णी, ज्योती शिंदे, रुपा केदारे, शैलजा भावसार, दत्तात्रय माळी, अभिजित लचके आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर सुवर्णा जगताप यांनी एस.टी कर्मचार्‍यांचा संप दीर्घकाळ सुरू असल्याने त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सोडवावा अशी मागणी केली. तर कर्मचार्‍यांच्या वतीने मागणी केल्यानंतर एस.टी कर्मचारी बांधवांना शिधावाटप केल्याबद्दल गौतम जाधव यांनी जगताप कुटुंबीयांचे आभार मानले आहे.

एस.टी कर्मचार्‍यांचा संप प्रदीर्घ काळ चालल्याने या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. परिवहन महामंडळाने संप काळात वेतन बंद केल्याने शिक्षण, आरोग्य आदींसह मूलभूत गरजांना त्यांना सामोरे जावे लागत होते. या कुटुंबांची ससेहोलपट बघता त्यांचे ऋणातून उतराई होंण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून या कुटुंंबीयांना किराणा व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. भविष्यात या कुटुंबियांना ज्या अडचणी येतील त्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच पुढे राहू.

डी.के. जगताप, जि.प. सदस्य (लासलगाव)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com