नाशिक । Nashik

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गेल्या अनेक महिन्यांन पासून आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाचे पेठ रोडवरील विभागीय कार्यशाळा येथे (दि.२८) रोजी कालबाह्य झालेल्या एसटी, मिनीबसेस, लोखंड, अल्युमिनियम, पत्रे, पाटे भंगार विविध पार्टचा यांचा लिलाव होणार असून या प्रक्रिया सुरु झाली असून एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट गव्हर्नमेंट ई- ऑकॅशन सिस्टीम ऑकॅशन आय डी २०२०-एम यच-७८३१ माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्रथमच एसटी महामंडळ स्वता ई- ऑकॅशन घेत असून यापूर्वी खाजगी ठेकेदारा मार्फत लिलाव करत होते.पण एसटी महामंडळ अनेक उपन्नाचे स्त्रोत शोधत आहे. त्यामुळे आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी प्रथमच स्वता एसटी महामंडळ पहिल्यादाच लिलाव करणार असून या लिलावातून एसटी महामंडळाला यंदा अधिक उपन्नाची अपेक्षा असून यंदाच्या लिलावातून पाच कोट्यवधी उपन्नाची मिळण्याची शक्यता आहेत.

करोनामुळे यावेळी लिलाव होण्यास विलंब झाला.एसटी महामंडळ दरवर्षी लिलाव करत होते. मागील लिलाव एप्रिल-१९ मध्ये झाल्या नंतर साधारण दीड वर्षानंतर एसटी स्कप एसटी आणि लोखंडाचा लिलाव होणार असून दरवर्षी पेक्षा अधिक गाड्याचा आणि विविध पार्टचा साठा मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी स्क्रप मटेरीलचा लॉट बघण्यासाठी विभागीय कार्याशाळा येथे लिलाव होण्याची आधीच गर्दी करत आहेत.

लॉट लावण्याचे काम पूर्ण

गाड्याचे विविध सुटे पार्ट, टायर, बॅटरी, पाटे, स्प्रिंग, रेडियटर, लोखंड, बॅरल, गियर बॉक्स, स्टास्टर या विविध पार्टचे असलेले साधारण दोनशेहुन अधिक लॉट लावण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच लिलाव प्रक्रियेतुन एसटी महामंडळाला आर्थिक मदत होणार आहे.

एसटीचा महामंडळाचा ऐकूण साठा

स्क्रप बसेस - २००

मिनी बसेस - २०

लोखंड - ८५ टन

ऑल्युमिनियम - १२ टन

टायर - २००० नग

रबर - ५००० टन

फ्लाय विल - ४०० नग

बॅरल - ३००० नग

गाडीचे छोटे-मोठे पार्ट - ६५ टन