५० हजार मजुरांची घरवापसी करणाऱ्या एसटीला मिळाले ११५ काेटी

मागील लॉकडाऊनला केली होती वाहतूक
५० हजार मजुरांची घरवापसी करणाऱ्या एसटीला मिळाले ११५ काेटी

नाशिक | Nashik

गेल्या वर्षी करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

लॉकडाऊनमध्ये अनेक परप्रांतीय मजूर पायी तसेच मिळेत त्या साधानाने महाराष्ट्रातून त्यांच्या मूळगावी परतत होते. या मजुरांची पायपीट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोफत प्रवासी वाहतूक केली होती. त्यापोटी देय असलेले थकीत साडेनऊ लाख रुपये राज्य शासनाने एसटी महामंडळाला अदा केले आहे.

एसटी महामंडळाने ९ ते ३१ मे २०२० या कालावधीत मुंबई-नाशिकसह संपूर्ण राज्यातून परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे सुमारे ५० हजार मजुरांची यशस्वी घरवापसी झाली होती.

परप्रांतीय मजुरांच्या केलेल्या वाहतुकीबाबत एसटी महामंडळाने ५६ रुपये किलोमीटरप्रमाणे ११५ कोटी ९३ लाख १२ हजार ६३१ रुपयांचे देयक मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी ११५ कोटी ९३ लाख १२ हजारांचा निधी मंजूर करून एसटी महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबई, रायगड, धुळे आदी विभागीय कार्यालयांनी ९ लाख ५२ हजार ८६८ रुपयांचे पुरवणी देयक राज्य शासनाला पाठविले होते. संबंधित रक्कम तसेच ६३१ रुपयांची थकबाकी असे ९ लाख ५३ हजार ४९९ रुपये अदा करण्यात आले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे.

कोटींचा टोल

मजुरांच्या वाहतुकीसाठी २२ हजार ७४९ बसेस राज्यभरातून सोडण्यात आल्या होत्या. या बसेस तब्बल पावणेदोन काेटी किलोमीटर धावल्या. या बसेसच्या माध्यमातून एसटी महामंडळाला २ कोटी ७९ लाख ३६ हजार ७०१ रुपयांचा टोल विविध ठिकाणी भरावा लागला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com