लालपरीचा विहार सुरू,नाशिकमधून सुटल्या २० बसगाड्या
नाशिक

लालपरीचा विहार सुरू,नाशिकमधून सुटल्या २० बसगाड्या

बसस्थानके अनलाॅक

Bharat Pagare

नाशिक | Nashik

शासनाच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत गुुरुवारी दि. २० सुरू करण्यात आलेल्या एसटीच्या अांतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला पहिल्याच दिवशी नाशिकमधून प्रवाशांचा प्रतिसाद लाभला.

तब्बल पाच महिन्यांनतर शहरातील बसस्थानक अनलाॅक झाली. शहरातून परजिल्ह्यासाठी गुरूवारी सांयकाळी ६ वाजेपर्यंत १९ ते २० बसेसमधून ५०० प्रवाशांनी प्रवास केला. कराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २३ मार्चपासून करण्यात अालेल्या लाॅकडाऊनमुळे एसटी बसेसमधून प्रवासी वाहतुकीस मनाई करण्यात अाली हाेती. त्यामुळे राेज हजाराे किलाेमीटर धावणाऱ्या एसटी बसेस गेल्या पाच महिन्यापासून डेपाेतच उभ्या हाेत्या.

शहरातील नवीन सीबीएस, महामार्ग बसस्थानक येथून पुणे, अाैरंगाबाद, नंदूरबार, कसारा, अहमदगनगर, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रवाशांच्या गर्दीनुसार बसेस साेडण्यात अाल्या हाेत्या. पाच महिन्यानंतर बसेस सुुरु झाल्यामुळे सकाळपासून शहरातील नवीन सीबीएस, महामार्ग बसस्थानक येथे प्रवाशांची गर्दी हाेती.

साेडण्यात आलेल्या बसेसमध्ये मात्र केवळ २२ प्रवाशांनाच परवाननी देण्यात अाली हाेती. सांयकाळपर्यंत ५०० प्रवाशांची प्रवास केल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.

एसटीकडून प्रवाशांची काळजी

एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपायाेजना करण्यात अालेल्या अाहेत. प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारक करण्यात अालेले अाहे. तसेच सर्व बसेसमध्ये सॅनिटायझरची फवारणी केली जात अाहे.

प्रवाशांची दिलासा

पाच महिन्यानंतर बसेस सुरु झाल्याने एसटीचे ठप्प झालेले उत्पन्न पुन्हा प्राप्त हाेण्यास मदत हाेणार अाहेत. तसेच या सुविधेमुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रवाशांची देखील साेय हाेणार अाहे.

-नितीन मैंद, विभाग नियंत्रक, नाशिक.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com