
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल (SSC Exam Result) आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात नाशिक विभागाचा (Nashik Division) निकाल ९५. ९० टक्के लागला असून हा निकाल राज्यात सर्वात कमी आहे. कोकण विभागाचा (Kokan Division) निकाल सर्वाधिक ९९.२७ टक्के लागला आहे.
दहावीच्या निकालांमध्ये यंदाही मुलींचीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेला यंदा नाशिक विभागातून १ लाख ९६ हजार ७१४ विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले होते. त्यापैकी १ लाख ८८ हजार ६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागनिहाय निकाल
कोकण : ९९.२७
कोल्हापूर : ९८.५०
लातूर : ९७.२७
नागपूर : ९७.००
मुंबई : ९६.९४
अमरावती : ९६.८१
औरंगाबाद : ९६.३३
पुणे : ९६.१६
नाशिक : ९५.९०
परीक्षा केंद्रे आणि विद्यार्थी
एकूण परीक्षा केंद्रे - २१ हजार ३८४
मुख्य केंद्रे : ५ हजार ५०
उपकेंद्रे : १६ हजार ३३४
परीक्षा अर्ज भरलेले विद्यार्थी : १६ लाख ३८ हजार १७२
विद्यार्थी : ८ लाख ८९ हजार ५८४
विद्यार्थिनी : ७ लाख ४९ हजार ४७८
अशी आहेत निकालाची वैशिष्ट्ये
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९६.०६ टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा १.९० टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
राज्यातील २२ हजार ९२१ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्या[पैकी १२ हजार १२० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातील २९ शाळांमध्ये शून्य टक्के निकाल लागला आहे.
राज्यात एकूण १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले, तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८३ हजार ०६० इतकी आहे.
एकूण ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातून नियमित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ५ लाख ७० हजार २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख ५८ हजार २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ४२ हजार १७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.