निकाल
निकाल
नाशिक

हुश्श ! प्रतीक्षा संपली... उद्या लागणार दहावीचा निकाल

इथे पाहता येणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

दहावीच्या निकालासाठीची प्रतीक्षा अखेरीस आज संपत आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार, उद्या(२९) जुलै रोजी दुपारी १ वाजता इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

उद्या दुपारी निकाल जाहीर झाल्यावर mahresult.nic.in सहित maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्वर तुम्हाला तुमचे गुण तपासता येतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते. यंदा दहावीची परीक्षा 4979 परीक्षा केंद्रांवर पार पडली आहे.

करोनाच्या संकटामुळे दहावीचा शेवटचा म्हणजेच भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. या विषयात सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल.

असा पहा निकाल

अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.

तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com