अकरावीसाठी दहावीचे गुणपत्रक बंधनकारक

अकरावीसाठी दहावीचे गुणपत्रक बंधनकारक

नव्या सूचना जाहीर

नाशिक ।प्रतिनिधी Nashik

सध्या इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रवेश अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना दहावीचे ऑनलाइन गुणपत्रक अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. करोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या वर्षीच्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी सादर करायच्या विविध प्रमाणपत्रांबाबत उपसचिव राजेंद्र पवार यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षण संचालकांना पत्र पाठवून नव्या सूचना केल्या आहेत.

यामध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरतांना फक्त दहावीचेच ऑनलाईन गुणपत्रक अपलोड करणे बंधनकारक करण्यात यावे, ज्या विद्यार्थ्यांकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (एनसीएल) ही प्रमाणपत्र उपलब्ध असतील, असे विद्यार्थी ही प्रमाणपत्रे अपलोड करु शकतील,

मात्र ही प्रमाणपत्रे अपलोड करणे बंधनकारक करण्यात येऊ नये. क्रिडा प्राविण्य, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ प्रमाणपत्र व बदली आदेश. इ. समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे किंवा ही प्रमाणपत्रे मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत विद्यार्यांना अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक राहील. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी काही तांत्रिक बाबीमुळे सादर न केल्यास त्यांच्याकडून हमीपत्र भरुन घेण्यात यावे.

विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात यावी. अकरावीसाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणारा प्रवेश हा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या माहितीच्या व हमीपत्राच्या आधारे देण्यात येणार असल्याने अचूक व योग्य कागदपत्रे सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असल्याचे संकेतस्थळावरुन विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com