श्री श्री रवि शंकर 'या' तारखेला नाशकात

श्री श्री रवि शंकर 'या' तारखेला नाशकात
USER

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आर्ट ऑफ लिव्हिंग (Art of Living) या संस्थेला चाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर श्री श्री रवि शंकर (Sri Sri Ravi Shankar) येत्या २८ फेब्रुवारीला नाशकात येत असल्याने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारोच्या संख्येने श्री राम रक्षा स्तोत्र (Shri Ram Raksha Stotra) पठण होणार आहे.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नाशिक (nashik) येथे मोठ्या संख्येने श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण नित्य नियमाने चालू आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसेवकानी घरोघरी जाऊन तसेच मॉल, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी जाऊन ज्ञानगंगा (Gyan Ganga) या कार्यक्रमाची माहिती देऊन सर्वांना आमंत्रित केले आहे. तसेच हरसुल (harsul), पेठ (peth), सुरगाणा (surgana) या आदिवासी भागात सत्संग, गुरु पूजा या माध्यमातून हजारो आदिवासी बंधू-भगिनींना निमंत्रित केले आहे.

विद्यापीठे, कॉलेजेस, हायस्कूल या ठिकाणी असणाऱ्या शिक्षक (teachers) तसेच विद्यार्थी (students) यांना योगाचे, ध्यानाचे महत्त्व सांगून त्या ठिकाणी ध्यान शिबिरे घेतली जात आहे. रक्तदान शिबिर (Blood donation camp), रोग निदान, शिबिरे, महिलांसाठी हळदीकुंकू या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिक नगरीतल्या प्रत्येक घराघरात भक्ती की लहर हा कार्यक्रम पोहोचून श्री श्री रविशंकर जी यांच्या सानिध्यात होणाऱ्या ज्ञानगंगा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नासिक मधील मंदिरांमध्ये जाऊन तेथील विश्वस्त आणि भाविकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलेले आहे. या कार्यक्रमासाठी (दि.२०फेब्रुवारी) कार्यक्रमस्थळी ठक्कर डोम (Thakkar Dome) येथे भूमिपूजन करण्यात आले असून (दि.२२ फेब्रुवारी) श्री काळाराम मंदिर येथे सायंकाळी श्री राम रक्षा स्तोत्र आणि सत्संग विश्वस्तांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आर्ट ऑफ लिविंग (Art of Living) च्या वतीने उल्हास पाटील अपेक्स मेंबर महाराष्ट्र, स्मृति ठाकूर एस.टी.सी. विजय हाके एस एस आर डी पी, चिराग पाटील, करुणासागर जिरे, प्रसाद पिंपळे, डी.टी.सी. किशोर पाटील नीलम गायधनी, ऍडव्होकेट विशाल चव्हाण, स्वामी वैशंपायन, स्वामी प्रणवानंद, ब्रह्मचारी विजयजी कल्याणकर, यांच्यासह आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षक, स्वयंसेवक कार्यरत आहेत.

या पुढे राबवण्यात येणारे उपक्रम

(दि. 23 फेब्रुवारी) ठक्कर डोम मैदानात सकाळी ८ ते १० बाईक रॅली जमून ११ ते १ यावेळेत १५० बाईक स्वार रॅली ग्राउंड वरून जेहान सर्कल, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, एबीपी सर्कल मार्गे गोविंद नगर पर्यंत जाणार. (दि. २५ व २६ फेब्रुवारी ) शहरातील मॉल्स मध्ये फ्लैश मॉब च्या माध्यमातून युवक, युवती नाशिककरांना २८ तारखेला होणाऱ्या ज्ञानगंगा या कार्यक्रमाचे निमंत्रण देणार.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com