श्री सप्तशृंगी मंदिराचे होणार नूतनीकरण

सप्तशृंगी गड
सप्तशृंगी गड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

साडेतीन शक्तीपीठातील एक असलेल्या श्री शप्तश्रृंगी देवी मंदिराचे (Shri Saptashringi Devi Temple) नूतनीकरणाचे काम (Renovation work) हाती घेण्यात आले असून

येत्या महिन्याभरात मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचा सुतोवाच सप्तशृंगी देवस्थान मंदिर ट्रस्टच्या (Saptshringi Devasthan Mandir Trust) वतीने ॲड. ललित निकम यांनी केले.

सुयश हॉस्पिटल व सप्तशृंगी देवस्थान मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार परिषदेत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायाधीश वर्धन देसाई (District Sessions Judge Vardhan Desai), सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रशांत देवरे, डॉ. प्रदीप पवार, डॉ. हेमंत ओस्तवाल, ॲड. ललित निकम ॲड. दीपक पाटोदकर, सरपंच रमेश पवार, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अजय दुबे, सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, डॉक्टर पुष्पक पलोड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंदिर विकासाची माहिती देताना 22 चौरस फुटामध्ये मंदिराची पुनर्निर्मिती केली जाणार असून मागील 30 ते 40 वर्षांनंतर कामाला प्रारंभ केला जाणार आहे कायदेशीर सोपासकार परवानगी सर्व पूर्ण झाले असून येत्या महिन्याभरात मंदिर उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे यात प्रामुख्याने मंदिराच्या गाभाऱ्याला चांदीचे आवरण लावले जाणार असून

येत्या पाच ते सहा महिन्यात गाभाऱ्याचं सुशोभीकरण (beautification) केले जाईल या सोबतच देवीच्या मूर्तीवरून काढण्यात आलेल्या शेंदुराचा स्तंभ उभारला जाणारा असून तो मंदिराच्या पहिल्या पायरी जवळ उभारण्यात येणार आहे रोपवे समोर प्रशासकीय कार्यालय तसेच इतर समन्वय कार्यालय उभारले जाणार आहेत तलावाच्या सुशोभीकरणासाठी जन संग्रहातून खर्च केला जाणार आहे भाविकांच्या सहयोगातून सुशोभीकरण केले जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सप्तशृंगी ट्रस्ट व सुयशचा सामंजस्य करार

सुयश हॉस्पिटलच्या माध्यमातून सप्तशृंगी मंदिर परिसरात काम करणाऱ्या कर्मचारी सेवक पुजाऱ्यांसह ग्रामस्थांच्या आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करारावर पत्रकार परिषदेत स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार सुयश हॉस्पिटलच्या माध्यमातून सप्तशृंगी मंदिर परिसरात उपलब्ध असलेल्या रुग्णालयात सुयशच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्याद्वारे रुग्णांच्या विविध तपासण्या करुन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत त्या व्यतिरिक्तच्या चाचण्यांसाठी नाशिक येथील सुयश रुग्णालयात 30 टक्के सवलती मध्ये सेवा दिली जाणार असल्याचे डॉ. ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com