जिल्हयात खत विक्रेत्यांवर भरारी पथकाची करडी नजर

जिल्हयात खत विक्रेत्यांवर भरारी पथकाची करडी नजर


नाशिक | Nashik

जिल्हयात खरीप हंंगामाची लगबग सुरु होताच शेतकर्‍यांची खत खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे. द रम्यान शेतकर्‍यांची खत विक्री करणार्‍यांकडून कोणतीही फसवणूक होउ नये म्हणून कृषी विभगाच्या भरारी पथकाची करडी नजर अशा विक्रेत्यांवर आहे. मागील पंधरा दिवसात 14 खत विक्री करणार्‍यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

नाशिक जिल्हयासाठी 2 लाख 58 हजार मेट्रीक ट्न रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 24 हजार मेट्रीक ट्न युरिया खत जिल्हयाला उपलब्ध झाले आहे. विक्रेत्यांनी शेतकर्‍यांना छापील किंमतीमध्येच खते द्यावीत. अशा सुचना कृषी विभागाने जिल्हयातील विक्रेत्यांना दिलेल्या आहेत.

खत विक्री करताना कोणताही काळबाजार होउ नये याकरिता जिल्हयातील एकुण 1380 विक्रेत्यांना इ-पॉस मशीन देण्यात आले आहे. या मशीनवर शेतकयांचा अगठयाचा ठ्सा घेउन किंवा आधारकाड र् ला मोबाइल क्रमांक लिंक असल्यास अंगठ्याचा ठसा देण्याची आवश्यकता पड्त नाही. ही प्रक्रीया पूण कर्रताच शेतकर्‍याला खते मिळ्ते तसेच या सर्वाची माहिती कृषी विभागाकडे असते.

इ पॉसमशीनवर ताण येत असल्याने शेतकर्‍यांना अनेकदा थांबावे लागते, भरारी पथकाने मालेगांव, नांद्गगाव, उमराणे याठिकाणच्या विक्री केद्रावर धाडी टाकून कारवाइ केली आहे. दुकानांच्या बाहेर खत साठा, त्यांचे भाव आदी माहिती लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सुचनांना बहूतेक दूकानदारांकडून हरताळ फासल्याचे चित्र असून याकडे कृषीच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

इ पॉसमुळे खत वितरणात पारदश कर्ता
शेतकर्‍यांची, शासनाची खत विक्रेत्यांकडून होणारी फसवणूक इ-पॉस मशीनमूळे बंद झाली आहे. खताच्या विक्रीमध्ये तफावत दिसून आल्यास विक्रेत्याच्या परवान्याचे निलंबन केले जाते. मागील पंधरा दिवसात जिल्हयातील 14 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
रमेश शिंदे, कृषी विकास अधिकारी, जि.प

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com