महाराजा सयाजीरावांची मुल्ये जगभरात पोहोचवा : सामंत

महाराजा सयाजीरावांची मुल्ये जगभरात पोहोचवा : सामंत

नाशिक | Nashik

महाराजा सयाजीराव गायकवाड (Maharaja Sayajirao Gaikwad) यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त नाशिक (nashik) या त्यांच्या जन्मभुमीत होत असलेल्या संमेलनात त्यांचा जीवन परिचय करुन देणार्‍या ग्रंथाचे प्रकाशन (Publication of texts) होणे ही आनंदाची बाब आहे. पुढील काळात ग्रंथ, नाटक (Drama), चित्रपट (Movies) या माध्यमातून महाराजा सयाजीराव यांचे मूल्य, आदर्श जगभरात पोहचावे अशी अपेक्षा उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री (Minister of Higher Education and Technology) तथा प्रकाशन समितीचे (Publication Committee) अध्यक्ष उदय सामंत (uday samant) यांनी व्यक्त केली.

महाराजा सयाजी गायकवाड यांचा जीवन परिचय करुन देणार्‍या 50 ग्रंथांचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. तांत्रिक कारणामुळे उपस्थित राहू न शकल्याने सामंत यांनी या सोहळ्यास ऑनलाईन (online) हजेरी लावली. यावेळी व्यासपीठावर राजमाता शुभांगिनी गायकवाड (Shubhangini Gaikwad), स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (chagan bhujbal), प्रकाशन समितीचे सचिव बाबा भांड आदी उपस्थित होते.

राजमाता शुभांगी राजे गायकवाड म्हणाल्या, सयाजीराव यांचे विचार आजही समाजाला दिशादर्शक आहे. त्यांनी 63 वर्ष राज्य करताना महिलांसाठी मोठे काम केले.अस्पृश्य महिलांसाठी पहिली शाळा काढली. अस्पृश विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह काढले. पहिली व्यायामशाळा बांधली. त्याचबरोबर कायद्याचे संरक्षण महिलांना दिले.

ज्या हिंदू कोड बीलच्या (Hindu Code Bill) मुद्यावरुन डॉ.आंबेडकर यांना राजीनामा द्याव्या लागला होता. त्या बिलच्या मुद्यांची सयाजीराव यांनी स्वातंत्र्यापुर्वीच त्यांच्या राज्यात अंमलबजावणी केली होती. त्यांचे हे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याने ते आता राज्य पातळीवर न राहता देश पातळीवर पोहचवण्यासांठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वागताध्यक्ष भुजबळ म्हणाले, सयाजीरावांच्या जीवन परिचय देणार्‍या ग्रंथांचे प्रकाशन करणे हे मी भाग्य समजतो. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सयाजीराव महाराजांनी मदत केली. असामान्य लोक घडवणारा हा राजा होता. बहुजन समाजाला लिहिण्याचा अधिकार प्राप्त झाल्याने महाराजांचे चरित्र जगासमोर आले. अशा अलौकिक राजाचे चरित्र जगापुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी प्रकाशन समितीला केला.

ग्रंथ प्रकाशन समितीचे सचिव बाबा भांड यांनी प्रास्ताविकात सयाजीरावांचा जीवनाचा परिचय करुन देताना अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. महाराजांनी त्याकाळी शिष्यवृत्तीवर 89 कोटी म्हणजे आजचे दोन हजार कोटी खर्च केले. जात, पात, धर्म या भिंतींच्या पलीकडे त्यांचे कार्य होते. मात्र, मागील साठ वर्ष त्यांच्या या कार्याकडे दुर्लक्ष झाले अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चार टप्प्यांमध्ये महाराजा सयाजीराव यांच्या जीवन परिचय करुन देणार्‍या पन्नास ग्रंथांचे प्रकाशन झाले. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ.धनंजय माने यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.