Video : नाशकात फिरतंय ड्रोन सॅनिटायझर

संपूर्ण शहरात करणार अंमलबजावणी : खा. गोडसे
Video : नाशकात फिरतंय ड्रोन सॅनिटायझर

नाशिक | Nashik

नाशिक शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध लागू करण्याबरोबरच १३ कन्टमेंन्ट झोनमध्ये खा. हेमंत गोडसे यांच्या पुढकाराने ड्रोनद्वारे हायक्लो फोराईड सॅनिटायझरची फवारणीला प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे.

शहरातील मुख्य रहदारीचा चौक असलेल्या रविवार कारंजा परिसरात बुधवारी (दि.१२) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास खा गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ड्रोनद्वारे फवारणीला सुरुवात करण्यात आली. बंगलोर येथील गरुडा ऐरोस्पेसच्या माध्यमातून ही फवारणी करण्यात येत आहे. या ड्रोनच्या माध्यमातून शहरातील तेरा मुख्य झोनमध्ये ही फवारणी करण्यात येणार आहे.

खा गोडसे यांनी गेल्या पंधरवाड्यात गरुडा ऐरोस्पेसचे मुख्य अधिकारी अग्निश्वर जयप्रकाश यांच्याशी नाशिक शहरात ड्रोनद्वारे फवारणी संदर्भात चर्चा केली होती. त्यानुसार कंपनी च्या पथकाकडून प्रयोगिक तत्त्वावर रविवार कारंजा परिसरात फवारणी कामास सुरुवात करण्यात आली.

खा. गोडसे यावेळी म्हणाले की , या ड्रोन सॅनिटायझर चा फायदा झाल्यास शहरातील इतरही भागांत याचा उपयोग करण्यात येईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com