आयएमएतर्फे 27 ऑक्टोबरपासून क्रीडा स्पर्धा

आयएमएतर्फे 27 ऑक्टोबरपासून क्रीडा स्पर्धा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कामातून वेळ काढत शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हा संदेश देण्याच्या हेतूने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) राष्ट्रीय मुख्यालयाच्या वतीने नॅशनल आयएमए स्पोर्टस ऑलिम्पिकद्वारे भव्य क्रीडा स्पर्धांचे (Sports Competition) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी देशाच्या विविध भागातून डॉक्टर सहभागी होणार आहेत...

या स्पर्धेचे यजमानपद नाशिक आयएमएने स्वीकारले आहे, अशी माहिती नाशिक आयएमएचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस (Dr. Hemant Sonnis) आणि सचिव डॉ. कविता गाडेकर (Dr. Kavita Gadekar) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

दि. 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार्‍या या स्पर्धामध्ये देशभरातून 400 ते 500 डॉक्टर्स सहभागी होणार आहे. करोनाचे निकष पाळले जावे यासाठी स्पर्धांचे आयोजन विविध ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटासाठी वेगवेगळे पारितोषिक ठेवण्यात आले असून गर्दी होऊ नये या कारणास्तव पारितोषिक वितरण तिथेच होणार आहे. विजेत्या संघास तसेच खेळाडूस सन्मानचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या स्पर्धांमध्ये विशेष करून क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, लॉन टेनिस, ऍथेलेटिक्स्, कॅरम, बुध्दीबळ, बॅडमिंटन, स्विमींग, बास्केट बॉल यांचा समावेश आहे. या स्पर्धांसाठी गोल्फ क्लब ग्राऊंड, एनसीए ग्राऊंड, संदीप फाऊंडेशन, निवेक क्लब, नवरचना विद्यालयाचे ग्राऊंड, केन्सिटंन, नाशिक जिमखाना क्लब, मिनाताई ठाकरे स्टेडीअम,गोखले एज्युकेशन सोसायटी, एमव्हीपीचे इंजिनिअरींग कॉलेज ग्राऊंड, तसेच इंडियन मेडीकल असोसिएशन हॉल या ठिकाणी स्पर्धा खेळण्यात येणार आहेत.

ऑनलाइन कॉन्फरन्स

या स्पर्धांमध्ये महत्वाचे म्हणजे महिलांचा सहभाग उल्लेखनीय असणार असून त्यांच्यासाठी विशेष क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दरम्यान खेळाची तसेच क्रीडा क्षेत्रातील आजार, त्यांवर उपचारपद्धती यासाठी ऑनलाइन कॉन्फरन्स ठेवण्यात आली आहे.

अशा असतील स्पर्धा

क्रिकेट सिझन बॉल : 27 ते 31 ऑक्टोबर

टेनिस बॉल क्रिकेट पुरुषांसाठी : 29 ते31 ऑक्टोबर

टेनिस बॉल क्रिकेट महिलांसाठी : 29 ऑक्टोबर

बॅडमिंटन : 29 ते 31 ऑक्टोबर

लॉन टेनिस :- 28 ते 31 ऑक्टोबर

टेबल टेनिस : 29 ते 31 ऑक्टोबर

कॅरम : 28 तेे 30 ऑक्टोबर

बुद्धीबळ : 29 ते 30 ऑक्टोबर

स्क्वॅश : 29 ऑक्टोबर

फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल : 29 ते 30 ऑक्टोबर

अथलेटिक्स : 30 ऑक्टोबर

स्विमिंग : 29 ते 30 ऑक्टोबर

मॅरेथॉन : 28 ऑक्टोबर

सायक्लोथॉन : 29 ऑक्टोबर

वॉकेथॉन : 30 ऑक्टोबर

Related Stories

No stories found.