पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेस प्रतिसाद

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेस प्रतिसाद

नाशिक, प्रतिनिधी

मराठा विद्या प्रसारक समाज (MVP) नाशिक संचालित उदोजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयातर्फे (Udoji Maharaj Museum Of Educational Heritage) 'निसर्गपूरक गणपती बाप्पा' (Natural Ganesh Idol) या संकल्पनेतून दि. ४ सप्टेंबर रोजी कार्यशाळा (Workshop) आयोजित करण्यात आली होती. सदर उपक्रमांतर्गत शाडू मातीच्या (Shadu soil) गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उदोजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयातर्फे निसर्गपूरक गणेशोत्सवाच्या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत ६० पेक्षा अधिक जणांनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेत मविप्र समाजाच्या ललितकला महाविद्यालय, तसेच शिल्पकार रिया गाडेकर (Riya Gadekar) व तेजस सौंधाणकर (Tejas Saundankar) यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळा यशस्वी संपन्नतेसाठी चित्रकला शिक्षक राउत सर, मिलिंद पाटील, डिंगे जगदीश यांचे तसेच महेश अडबळ, महेश राऊत, संग्रहालयाच्या प्रशासकीय अधिकारी सीमा जाधव, तुषार दिंडे, शुभम पाटील तसेच जयश्री सापटे यांनी योगदान दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com