‘देशदूत’च्या वेबसाईट नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक

‘देशदूत’च्या वेबसाईट नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्याच दिवशी अनेकांची नोंदणी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दैनिक ‘देशदूत वृत्तसमूहा’च्या deshdoot.com या वेबसाईटवर शनिवारपासून नोंदणी सुरू झाली. नव्या स्वरुपातील आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असलेल्या या वेबसाईटच्या नोंदणीसाठी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला. नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदूरबारसह देशभरातील मराठी वाचकांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नोंदणी करून घेतली.

उत्तर महाराष्ट्रातील मातीत रुजलेल्या ‘देशदूत, सार्वमत’ने मराठी पत्रकारितेत वाचकांना नेहमीच नवनवीन आयाम दिले आहेत. तंत्रज्ञानाची कास धरून मराठीत पहिली वेबसाईट बनवण्याचा मान ‘देशदूत’ने 2004 मध्ये मिळवला. आता पुन्हा त्यापुढचा टप्पा गाठून फक्त बातम्या नाहीत तर बातम्यांसोबत विश्लेषण, व्हिडिओ स्टोरी, पॉडकास्ट देणारी ही मराठीतील पहिलीच वेबसाईट ठरली आहे.

पाच विभागांत ‘लोकल टू ग्लोबल’ असा माहितीचा खजिना दररोज 24 तास वाचकांना मिळणार आहे. त्यामुळे सतत अपडेट राहता येणार आहे. म्हणून पहिल्याच दिवशी अनेकांनी नोंदणी करून नवीन वेबसाईटच्या नव्या रचनेबद्दल समाधान व्यक्त केले.

‘देशदूत’सोबत ‘झी-5’.....

‘देशदूत’च्या वेबसाईट नोंदणीसोबत ‘झी-5’ची सबस्क्रिप्शनही घेता येणार आहे. त्यातही मासिक व वार्षिक सबस्क्रिप्शनचा पर्याय उपलब्ध आहे. वाचक आपल्या सोयीनुसार पर्याय निवडून सदस्य होऊ शकतात.

‘देशदूत, सार्वमत’ने वेबपत्रकारितेत खूप चांगला बदल केला आहे. स्थानिक बातम्या मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने आपण कुठेही असलो तरी लोकल कनेक्ट राहतो. नव्या वेबसाईटचा वेगही खूप चांगला आहे. याबद्दल ‘देशदूत, सार्वमत’ परिवाराचे अभिनंदन! सबस्क्रिप्शन खूपच वाजवी आहे.

अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट.

‘देशदूत’च्या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच नवीन माहिती मिळत आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी नोंदणी केली. सर्वात आधी ‘देशदूत’ वेबसाईटवर बातमी वाचायला मिळते. आता व्ह़िडिओ स्टोरी व पॉडकास्टमधून अधिक नवनवीन माहिती मिळत आहे.

अभिजित राऊत, नाशिक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com