जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषद (Zilla Parishad) अध्यक्ष चषकाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (Additional Chief Executive Officer) डॉ. अर्जुन गुंडे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले.

प्रत्येक विद्यार्थ्याने खेळांमध्ये सहभाग घ्यावा खेळातून माणसाचे व्यक्तिमत्व तयार होते, यातून जीवनाला आयाम मिळतो अशा शब्दात  डॉ. अर्जुन गुंडे (Dr. Arjun Gunde) यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

दोन दिवसीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल (Chhatrapati Shivaji Maharaj Sports Complex) येथे करण्यात आले आहे. तालुका स्तरावरील उत्कृष्ठ सादरीकरण केलेल्या स्पर्धकांची निवड ही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात येते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील चार हजार विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे. उद्घाटनाप्रसंगी  शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, मिता चौधरी, निलेश पाटील,  प्रभारी उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लग्नात हरवलेली दोन तोळ्याची पोत सापडते तेव्हा...

नाशिक (Nashik) तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लाडची येथील बँड पथकाने सर्वप्रथम पथसंचलन करून सलामी दिली, यानंतर सर्व तालुक्यांतील पथकांनी पथसंचलन केले. यानंतर स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सामूहिक नृत्य, वक्तृत्व, वैयक्तिक व सामूहिक गायन, कला स्पर्धांमध्ये चित्रकला, रांगोळी तर क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, धावणे या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com