रस्त्यावर थुंकणे महागात

वर्षभरात अडीच लाखांचा दंड वसुल
रस्त्यावर थुंकणे महागात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांना (spit in public places ) नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ( NMC Health Dept )चांगलाच दणका दिला आहे. वर्षभरात 248 व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी थुंकणे महागात पडले असून त्यांच्याकडून 2 लाख 44 हजार 400 रुपये एवढा दंड वसूल (Fine Collection)करण्यात आला आहे. यापूर्वी असलेल्या पाचशे रुपयांच्या दंडातील रकमेत वाढ करून तो आता हजार रुपये करण्यात आला आहे.

मागील दोन वर्षांत करोनाचे सावट होते.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कुणीही थुंकू नये याकरता प्रशासनाकडून दंडाची रक्कम वाढवण्यात आली होती.

दरम्यान, थुंकण्यामुळे करोनासह क्षयरोगसारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर महापालिकेकडून दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली.

मात्र यापूर्वी ही रक्कम दोनशे रुपये नंतर पाचशे रुपये होती. परंतु नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याचे चित्र होते. या प्रकाराला चाप बसवण्यासाठी पालिकेने या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीपासून ही दंडात्मक रक्कम वाढवण्यात आली. करोनाचा दोन वर्षे प्रभाव दिसून आला. संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांना मास्क बंधनकारक करण्यात आले होतेे.

पालिकेकडून थुंकण्याबरोबरच उघड्यावर कचरा टाकणे, प्रतिबंध केलेले प्लॅस्टिक वापरणे यासंबंधी दंड आकारला जातो आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महिन्याभरापासून अनिवार्य असलेल्या मास्कवरील निर्बंध हटवण्यात आले होते.

मात्र दिल्लीसह काही राज्यांमध्ये करोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याची प्रकरणे वाढत असून पुन्हा सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयांत मास्कची सक्ती केली जाऊ शकते.

Related Stories

No stories found.