नाशिककर नितीन मोरेंचे लंडनमध्ये अध्यात्मिक मार्गदर्शन

नाशिककर नितीन मोरेंचे लंडनमध्ये अध्यात्मिक मार्गदर्शन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) येथे सद्गुरू मोरेदादा यांच्या अथक परिश्रमातून उगम पावलेला आणि नंतर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे (Annasaheb More) यांनी खडतर प्रवासातून देशभर पोचवलेला श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आज सातासमुद्रापार जाऊन पोहचला आहे....

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या देश विदेश अभियानाअंतर्गत श्रीरामनवमीला (Ramnavmi) आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संमेलनाचे आयोजन यूरोपातील स्वामी भक्तांसाठी नितिन मोरे (Nitin More) यांच्या उपस्थितीत लंडन (London) येथे आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश परमपूज्य गुरूमाऊली यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेल्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याविषयी नितिन मोरे यांनी मार्गदर्शन केले.

सेवामार्गातील बालसंस्कार, गर्भसंस्कार, युवासंस्कार, आयुर्वेद, वेदविज्ञान संशोधन आदी विविध उपक्रमांतून सेवामार्गाचे सामाजिक योगदानाबद्दल युरोपातील स्वामीभक्तांना अवगत करण्यात आले.

नितिन मोरे यांचे हितगुज ऐकून यूरोप खंडात श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा (Sri Swami Samarth Seva Marg) विस्तार करण्यासाठी स्वामीभक्त आणि स्वामी सेवकरी प्रेरीत झाले.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 17 व्या आशिया युरोप बिझनेस अँड सोशल फोरममध्ये (Asia Europe Business and Social Forum) एशिया वन मॅगझिन (Asia One Magazine) आणि युआरएस मीडिया इंटरनॅशनलद्वारे (URS Media International) आयोजित पुरस्कार सोहळ्यासाठी नितिन मोरे यांना अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले.

हा पुरस्कार समारंभ युनायटेड किंगडमचे संसद सदस्य, ट्युनिशियाचे राजदूत महामहिम नबिल बेन खेहर, सर्बियाच्या राजदूत महामहिम अलेक्झांड्रा जोक्सिमोविच आणि मोल्दोव्हाच्या राजदूत अँजेला पोनोमारीओव्ह यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाला एशिया वन इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट तसेच युरोप आणि यूएसएमधील सेलिब्रिटीं उपस्थित होते.

कार्यक्रम झीटीवी तसेच अन्य चॅनल्सवर दाखवण्यात आला. द मॅरियट ग्रोसवेनर स्क्वेअर हॉटेल, लंडन, यूके येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. नितिन मोरे यांनी युनायटेड किंगडमच्या संसद सदस्यांना सेवामार्गाची माहिती देऊन श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे येण्यासाठी आमंत्रित केले.

Related Stories

No stories found.