स्पाईसजेट सेवांचे वेळापत्रक जाहीर

जानेवारीपासून गोवासाठी उडान
स्पाईसजेट सेवांचे वेळापत्रक जाहीर

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

करोनामुळे (Corona) जवळपास वर्षभरापासून उड्डाणे बंद होती. आताही टप्प्याटप्प्याने सुरू होत असल्याने स्पाईसजेट (SpiceJet) कंपनीने आपल्या उन्हाळी सेवेचे वेळापत्रक जाहीर केले आहे...

त्यानुसार 27 मार्चपासून नाशिकहून विविध शहरांसाठी उड्डाणे निश्चित केली आहेत. विशेष म्हणजे यात पूर्वीच्या दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या सेवांसोबत आता गोव्याचा (Goa) नव्याने समावेश करण्यात आला आहे. या सेवेमुळे नाशिककरांना आता अवघ्या सव्वा तासात गोव्याला पोहोचणे शक्य होणार आहे.

मागील वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व विमान कंपन्यांनी आपल्या सेवा बंद केल्या होत्या. त्यातील अलायन्स एअर, ट्र्यूजेट आणि स्टार एअरच्या सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र सर्वाधिक सेवा असलेल्या स्पाईसजेट कंपनीने मात्र अद्याप नवीन वेळापत्रक जाहीर केले नव्हते.

गेल्या महिन्यात केंद्रीय विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांना पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना लिहिलेल्या पत्रानंतर स्पाईसजेटची उडानअंतर्गत जानेवारीपासून सेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

या उपक्रमांतर्गतच्या सेवांमध्ये जानेवारीपासून गोवा विमानसेवेस प्रारंभ होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. स्पाईसजेटने मार्च ते ऑक्टोबर याकाळातील आपले वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार येत्या 27 मार्च 2022 पासून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद व गोव्यासाठीच्या उड्डाणांनाही प्रारंभ होणार आहे. ही सेवा आठवड्याचे सातही दिवस असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com