वित्त आयोगातील निधी रस्ते, पूलांवर खर्च करा : वाजे

वित्त आयोगातील निधी रस्ते, पूलांवर खर्च करा : वाजे
USER

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने (Cloudburst-like rain) ग्रामीण भागातील रस्ते (road), पूल (bridge), मोरी मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाले आहेत. तसेच अनेक पूल व मोर्‍यांचे भराव वाहून गेल्याने 15 वित्त आयोगातील (Finance Commission) निधी (fund)

महापुराने (flood) क्षतिग्रस्त झालेल्या रस्ते, पूल, मोरी, भराव यांवर प्राधान्याने खर्च करावा अशी मागणी माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांनी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे (Group Development Officer Madhukar Murkute) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ढगफुटी सदृश पावसाने तालुक्यातील नद्यांना महापुराचे स्वरुप आले होते. या पुरामुळे नद्यांवरील छोटे पूल, मोरी, भराव आदी मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाले असून काही ठिकाणी वाहून गेलेले आहेत. परिणामी ग्रामस्थांची दळणवळणाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

विद्यार्थ्यांना (students) शाळा (school), महाविद्यालयांमध्ये (college) उपस्थित राहणे जिकरीचे होत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान (Educational loss) होत आहे. तसेच शेतकर्‍यांना आपला कृषिमाल बाजारपेठेमध्ये आणणे अडचणीचे होत असल्याने त्यांस देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून

त्यास लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्याकरिता क्षतिग्रस्त रस्ते, पूल, मोरी, भराव आदीची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. 15 वित्त आयोगातील निधी या कामांकरिता प्राधान्याने खर्च केल्यास ग्रामीण भागातील जनजीवन लवकरात लवकर पूर्वपदावर येण्यास मदत होईल. या गोष्टीचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी वाजे यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com