शंभर टक्के निधी खर्च करा : सभापती आहेर

शंभर टक्के निधी खर्च करा : सभापती आहेर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास Zilla parishad Women Child Welfare Department विभागाने सन 2019-20 मध्ये मंजूर केलेला अंगणवाडी इमारत बांधकामे अद्याप काही ठिकाणी सुरू झालेली नाहीत.तर काही कामे प्रगतिपथावर आहेत. बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याशी समन्वय करून अंगणवाडी इमारत बांधकामे गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करून घ्यावीत. मार्च 2022 अखेर 100 टक्के निधी खर्च Funds spend झालाच पाहिजे,अशी ताकीद जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर Women Child Welfare Committee Chairperson- Aashviini Aher यांनी सर्व बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांना दिल्या.

जि.प. महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.बैठकीला समिती सदस्य कविता धाकराव, रेखा पवार, सुनीता सानप, गीतांजली पवार गोळे, कमल आहेर, गणेश अहिरे, समिती सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे व 26 प्रकल्पांतील बालविकास अधिकारी उपस्थित होते. कुपोषण, अंगणवाडी भरती पोषण आहार वाटप याबाबत सभापती आहेर यांनी आढावा घेतला.

ऑक्टोबरअखेर कुपोषित बालकांचा आढावा यावेळी घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यात 280 तीव्र कुपोषित बालके (सॅम) आहेत. कुपोषण व्यतिरिक्त अमृत आहार योजना अंतर्गत पोषण आहार वाटप, अंगणवाडी बांधकामे कामांचा आढावा यावेळी झाला.

अंगणवाडी बांधकामाचाही आढावा सभापती आहेर यांनी घेतला. यात सन 2019-20 मध्ये मंजूर झालेली कामे अद्यापही पूर्ण झालेली नसल्याचे दिसून आले. तसेच अनेक कामांना अद्याप सुरुवात देखील झालेली नसल्याचे दिसून आल्याने ही कामे मार्चअखेर गुणवत्तापूर्वक पूर्ण करावीत, अशा सूचना सभापती आहेर यांनी यावेळी दिल्या.

अशी आहेत तीव्र कुपोषित बालके

आदिवासी प्रकल्प

पेठ (19), हरसूल (26). त्र्यंबकेश्वर (12). सुरगाणा (12). बार्‍हे (9) इगतपुरी (14). दिंडोरी (12). उमराळे (5), नाशिक (16). कळवण- 1 (6), कळवण- 2 (5). देवळा (13), बागलाण- 2 (10).

बिगर आदिवासी प्रकल्प

बागलाण-1 (12), सिन्नर- 2(5), निफाड (14), मनमाड (27). पिंपळगाव (10). येवला-1 (3). येवला-2 (6). नांदगाव (10), चांदवड-1 (4). चांदवड-2 (3). मालेगाव (15), रावळगाव (12)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com