पावसाच्या विश्रांतीनंतर द्राक्षबाग छाटणीला वेग

पावसाच्या विश्रांतीनंतर द्राक्षबाग छाटणीला वेग

पालखेड बंधारा । वार्ताहर | Palkhed Dam

गेल्या कित्येक दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) पावसाने (rain) कहर केल्यामुळे दुष्काळसदृश्य स्थिती (drought-like conditions) निर्माण होत असताना

याचा शेतकर्‍यांना (farmers) मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असणार्‍या या तालुक्यामध्ये ऑक्टोबर द्राक्ष बाग छाटणीला (Vineyard pruning) शेतकरी धोका पत्करून सुरुवात करत असल्याचे पहावयास मिळत आहे.

वास्तविक पाहता तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्येच हळूहळू सुरुवात होत असते. परंतु यावर्षी पावसाची विक्रमी नोंद झाल्याचे दिसून आल्याने शेतकर्‍यांमध्ये एक प्रकारे या पावसाची दहशत निर्माण झाल्याने या शेतकर्‍यांचे द्राक्ष बागेचे नियोजन कोलमडले. असे असताना देखील आता शेतकर्‍यांनी धोका पत्करून द्राक्ष बागा छाटणीला सुरुवात केली आहे.

दिवसेंदिवस रासायनिक खते (Chemical fertilizers), लिक्विड, औषधे यांचे दर वाढत असल्याने साधारणता एका एकरला छाटणीसाठी पेस्ट, मजुरी, वातावरणानुसार औषधे फवारणी, शिवाय वेगवेगळ्या रोगांचे प्रादुर्भाव घालवण्यासाठी ही फवारणी करावी लागते. त्यासाठी एकरी द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो.

द्राक्ष छाटणी टप्प्या टप्प्याने केली असता बाजारपेठेत भाव मिळण्याची शक्यता असते परंतु या पावसा मुळे हे नियोजन बिघडले असून पुढे काय याची चिंता शेतकर्‍यांना भेडसावत आहे. मात्र असे असले तरी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने यामुळे शेतकर्‍यांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला असून तालुक्यात आता द्राक्षबागांच्या छाटणीला शेतकर्‍यांनी (farmers) सुरुवात केली आहे.

दिंडोरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे आता सर्व आशा द्राक्ष बागांवर अवलंबून होत्या. मात्र या पावसामुळे द्राक्ष बागांच्या छाटण्या उशिरा होत असल्याने पुढे काय होणार हे सांगणे कठीण आहे. दिवसेंदिवस शेती व्यवसाय धोक्यात येत असून दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने शेती परवडणे कठीण झाले आहे.

- ज्ञानेश्वर गायकवाड, पालखेड बंधारा, शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com