सोसायटी मार्फत शेतकर्‍यांना कर्जवाटपास गती
सोसायटी मार्फत शेतकर्‍यांना कर्जवाटपास गती
नाशिक

सोसायटी मार्फत शेतकर्‍यांना कर्जवाटपास गती

Nitin Gangurde

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यात विविध विकास सोसायटी मार्फत शेतकर्‍यांना कर्ज वाटपास गती आली असल्याची माहिती जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील यांनी दिली.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना विकास सोसायटीत मार्फत कर्जवाटप आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कर्ज जात होते. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅक ही शेतकर्‍यांची अर्थ वाहिनी म्हणून ओळखली जाते.

परंतु नैसर्गिक आपत्ती, कर्ज माफी, नोट बंदी व संपूर्ण जगावर करोना सारख्या रोगाचे आलेले संकट या अनेक कारणामुळे बँक अडचणीत आली होती. त्यामुळे शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज मिळणे अडचणीचे झाले होते.

त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता. परंतु सर्वच राजकीय पक्षांनी शासनाकडे केलेली कर्जमाफीची मागणी व जिल्हा बँक संचालक मंडळाकडे वेळोवेळी केलेला पाठपुरावा केल्याने शासनाने परवानगी दिली. यामुळे बँकेला कर्ज वितरणास दिलासा मिळाला आहे.

म्हणुन बँकेने त्वरीत अडचणी सापडलेल्या व वेळीच कर्ज फेडी करणार्‍या शेतकर्‍यांना सहकार्य व्हावे, म्हणून संचालक मंडळाने निर्णय घेतला. जिल्हा बॅकेचे संचालक गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक सतीश खरे यांनीही सर्व अधिकारी, कर्मचारी यांना कर्जवाटपा बाबत योग्य त्या सुचना दिल्या.

कर्ज वाटपास सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांनी आपल्या सोसायट्यांकडे आवश्यक ती पुर्तता करुन कर्ज उपलब्ध करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com