ड्रायपोर्ट उभारणीला मिळणार गती

ड्रायपोर्ट उभारणीला मिळणार गती

पालखेड मिरचीचे । वार्ताहर | Palkhed Mirchiche

राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर (Logistics Management Company) काम करण्यास जेएनपीटीने (JNPT) संमती दर्शविल्यानंतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना (farmers) त्यांचा शेतमाल जलद गतीने देश-विदेशात पोहोचविता यावा, यासाठीचा प्रस्तावित निफाड ड्रायपोर्ट (Niphad Dryport) उभारण्याचा मार्ग आता काहीसा मोकळा झाला आहे.

ड्रायपोर्ट (Dryport) उभारणीच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी रविवारी (दि.15) लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौर यांनी प्रस्तावित ड्रायपोर्टच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी त्यांना ड्रायपोर्टसाठी आवश्यक असणारी रेल्वेलाईन, महामार्ग आणि पुरेशा जागेच्या उपलब्धतेची माहिती दिली. ड्रायपार्टसाठी उपयुक्त सर्वच बाबी पुरेशा उपलब्ध असल्याने गौर यांनी समाधान व्यक्त केले.

प्रस्तावित जागा लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनी प्रशासनाच्या पसंतीस उतरल्याने प्रलंबित असलेला ड्रायपोर्ट प्रकल्प (Dryport Project) उभारण्याच्या कामाला गती येणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतमाल मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतो. यामध्ये भाजीपाल्यासह द्राक्ष, कांदा, डाळींब, उस आदींचा समावेश आहे. उत्पादित शेतमाल विक्रीसाठी जलदपणे देश, विदेशात पोहचविता यावा, यासाठी जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी निफाड साखर कारखान्याची (Niphad Sugar Factory) जागा प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या प्रस्तावास गती येण्याकामी लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनी प्रशासनाकडून प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्याची मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar), खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्याकडून सतत होत होती. डॉ.पवार, गोडसे यांची मागणी आणि प्रकल्पाविषयीची तळमळ भावल्याने आज लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी प्रकाश गौर यांनी अधिकार्‍यांसह निफाड येथील ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या पाहणीसाठी निफाडला भेट दिली.

ड्रायपोर्ट प्रकल्प निफाड कारखान्याच्या 110 एकरवर प्रास्तावित असून, खासदार गोडसे यांनी प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेली संपूर्ण जागा प्रकाश गौर आणि त्यांच्या अधिकार्‍यांना दाखविली. प्रस्तावित प्रकल्पाच्या आराखड्याचा नकाशा यावेळी खासदार गोडसे यांनी अधिकार्‍यांना दाखविला. अगदीच तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या दिंडोरी, जानोरी, आक्रोळे, सिन्नर, सातपूर, अंबड येथील औद्योगिक वसाहतीची माहिती आणि पुरकता याविषयीची माहिती खा.गोडसे यांनी अधिकार्‍यांना दिली.

त्यांनतर खा.गोडसे यांच्यासोबत अधिकार्‍यांचा दौरा करत ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या कसबे सुकेणे शिवारातील रेल्वेलाईनची आणि आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या महामार्गाची पाहणी केली. पुरेशी जागा, अगदीच कमी अंतरावर असलेली रेल्वेलाईन आणि मुंबई-आग्रा आणि नियोजित सूरत-चेन्नई महामार्ग पाहून कंपनीचे सीईओ प्रकाश गौर यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी कंपनीचे व्हॉइस प्रेसिडंट संजीव पाटील, नॅशनल हायवेचे डायरेक्टर भाऊसाहेब साळुंखे, नॅशनल हायवेचे तांत्रिक प्रबंधक दिलीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी, तहसीलदार शरद घोरपडे, डॉ.भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक मनोज बेलदार, कारखान्याचे अवसायक बी.आर. धनवटे, एमडी एस.बी. हांडोरे, सोमनाथ गडाख, बी.जी. पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com