नाशिक । प्रतिनिधी

इ-गव्हर्नन्सच्या माध्यमातून डिजिटल स्वाक्षरीचे उतारे डाऊनलोड करणे शक्य झाले असून आतापर्यंत तबबल 21 लाख 22 हजार 155 जणांनी हे उतारे डाऊनलोड करून घेतले आहेत.

याशिवाय आठ अ, फेरफार असे एकूण 33 लाख 35 हजार 266 उतारे डाऊनलोड करण्यात आले आहेत. संगणकीकृत सातबार्यामुळे तलाठी कार्यालयाचा उंबरठा न झिजवता एका क्लिकवर दाखले घरबसल्या मिळवणे सहज शक्य झाले आहे.

नागरिकांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागू नये व प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणावी यासाठी शासनाने सातबारा व विविध दाखल्यांचे संगणकीकरण केले आहे.

जिल्ह्यातही सातबारा उतार्यांचे संगणकीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आता बहुतांश सातबारा उतार्यांवर डिजिटल स्वाक्षरी झाल्याने हे उतारे घरबसल्याच डाऊनलोड करणे नागरिकांना शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे यासाठी तलाठी कार्यालये, तहसील कार्यालयांचे उंबरे झिजवण्यापासूनदेखील नागरिकांची मुक्तता झाली आहे.

डाऊनलोड केलेले उतारे

सातबारा उतारे- 21 लाख 22 हजार 155

आठ अ- 9 लाख 3 हजार 604

फेरफार- 3 लाख 9 हजार 507

एकूण - 33 लाख 35 हजार 266