
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
मध्य रेल्वेने ( Central Railway )उन्हाळी हंगामात ( Summer Season )प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मऊ दरम्यान विशेष शुल्कासह 20 अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या( Special Trains ) चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
01051 अतिजलद साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 28.4.2022 ते 30.6.2022 (10 फेर्या) दर गुरुवारी 05.15 वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसर्या दिवशी 12.45 वाजता पोहोचेल.
01052 अतिजलद साप्ताहिक विशेष मऊ येथून दि. 30.4.2022 ते 2.7.2022 (10 फेर्या) दर शनिवारी 05.45 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 12.00 वाजता पोहोचेल.
या गाड्यांना कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज, ग्यानपूर, बनारस आणि वाराणसी येथे थांबे देण्यात आले आहेत.