मध्य रेल्वेतर्फे सणांसाठी विशेष रेल्वे गाड्या

मध्य रेल्वेतर्फे सणांसाठी विशेष रेल्वे गाड्या

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

मध्य रेल्वे उत्सव विशेष रेल्वे गाड्या चालविणार आहे. या गाड्या आरक्षित असतील.

मुंबई-एलटीटी-मंडुआडी या गाडीच्या तेरा फेर्‍या होतील. 19 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत दर सोमवार, शुक्रवारी ती एलटीटीहून रात्री साडेबाराला सुटेल. भुसावळ, नाशिकरोड, खंडवा येथे ती थांबेल.

हटिया- मुंबई एलटीटी- हटिया या गाडीच्या 23 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान सहा फेर्‍या होतील. दर शुक्रवारी ही गाडी हटीयाहून 9.40 वाजता सुटेल. बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिकरोड येथे ती थांबेल.

कानपूर-मुंबई-एलटीटी गाडीच्या 23 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी, शुक्रवारी फेर्‍या होतील. मंगळवारी व शनिवारी ती भुसावळला 9.00 वाजता तर नाशिकरोडला 11.50 वाजता थांबेल. मुंबईहून येताना ती नाशिकरोडला 20.03 वाजता तर भुसावळला 22.55 वाजता थांबेल.

झांसी-पुणे-झांसी गाडीच्या 21 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी फेर्‍या होतील. भुसावळला ती 23.40 वाजता तर मनमाडला 2.30 वाजता थांबेल. छपरा-मुंबई-छपरा गाडी 20 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी धावेल.

भुसावळ, मनमाड, नाशिकरोडला ती थांबेल. पुणे-गोरखपूर-पुणे गाडीच्या सहा फेर्‍या होतील. 22 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर दरम्या दर गुरुवारी ही गाडी पुण्याहून 16.15 वाजता निघेल. खंडवा, भुसावळ, जळगांव, मनमाड येथे ही गाडी थांबेल.

पुणे-लखनऊ-पुणे गाडीच्या सहा फेर्‍या होतील. 20 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान ही गाडी पुण्याहून निघेल. भुसावळ, जळगाव, मनमाड येथे ती थांबेल.

पुणे-मंडुआडी-पुणे गाडीच्या सात फेर्‍या होतील. 19 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी ही गाडी निघेल. खंडवा, भुसावळ, मनमाड येथे ती थांबेल. पुणे-दरभंगा-पुणे गाड़ी 21 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी धावेल. खंडवा, भुसावळ, मनमाडला ती थांबेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com