मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाडी सुरु

मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाडी सुरु

नाशिकरोड । Nashik

उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त आरक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-गोरखपूर 01245 गाडी सीएसटीहून २८ एप्रिलला १७.१५ वाजता तर 01246 ही गाडी गोरखपूरहून ३० एप्रिलला सकाळी ०९.४५ वाजता सुटेल. मुंबई- गोरखपूर 01249 गाडी सीएसटीहून २९ एप्रिलला १७.१५ वाजता तर 01250 गोरखपूर-मुंबई गाडी १ मे रोजी ९.४५ वाजता सुटेल. या गाड्या कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा जंक्शन, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती येथे थांबतील. मुंबई-गोरखपूर 01239 ही गाडी एलटीटी येथून २८ एप्रिलला १४.३० वाजता तर 01240 गोरखपूर-मुंबई गाडी ३० एप्रिलला ४.०० वाजता सुटेल.

कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती येथे थांबेल. मुंबई एलटीटी-भागलपूर 01241 गाडी २९ एप्रिलला १४.३० वाजता तर 01242 भागलपूर-मुंबई गाडी १ मे रोजी ०५.४५ वाजता सुटेल. कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जंक्शन, सासाराम, गया, किउल, जमालपूर येथे थांबेल.

05191 गोरखपूर-पनवेल गाडी २८ एप्रिलला तर 05192 पनवेल-गोरखपूर गाडी २६ आणि 30 एप्रिलला सुटेल. मुंबई-एलटीटी-हावडा 01253 गाडी एलटीटीहून २८ एप्रिलला २२.०० वाजता सुटेल. ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर. टाटानगर, खडगपूर येथे थांबेल.

मुंबई-गुवाहाटी 01255 गाडी सीएसटीहून २८ एप्रिलला २३.४५ वाजता सुटेल. दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज आदी ठिकाणी थांबेल. 01249, 01253 आणि 01255 या विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग २६ एप्रिलला सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com