विशेष पॉडकास्ट : जागतिक रेडिओ दिन : रेडिओची क्रांती आणि महत्व

विशेष पॉडकास्ट : जागतिक रेडिओ दिन : रेडिओची क्रांती आणि महत्व

नाशिक | दिनेश सोनवणे

रेडिओ नाव जरी काढलं तरी आठवतं 'ये आकाशवाणी केंद्र है, और आप सून रहे है आप की फर्माईश!' 'अमीन सायानी' आणि बरच काही. लहानपणी विविध भारती, गीतमाला आणि आता विविध एफ.एम. स्टेशन्स द्वारे मनोरंजन करणारा एकमेवाद्वितीय म्हणजे आपला लाडका रेडिओ...

आज या रेडीओचा वाढदिवस आहे. आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. मंगल प्रभात सुरू झाली की चला उठा आता.. वाजले किती बघा.. कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई..उशीर झाला..अजून भाजी पोळी व्हायची आहे..असे आवाज स्वयंपाकघरातून यायचे.. संध्याकाळी बातम्यांच्या रूक्ष आवाजाच्या साथीने चहाचा आस्वाद घ्यायचा अन रात्रीच्या ‘आपली आवड’ च्या संगतीने डोळे मिटायचे.

रेडीओने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. संपर्काची माध्यमे बदललीत मात्र रेडीओने त्याचे स्थान आजही टिकवून ठेवले आहे. रेडीओचे महत्व आणि आजवरचा रेडीओचा प्रवास उलगडण्यासाठी दैनिक देशदूतच्या विशेष कार्यक्रम असलेल्या 'आमच्या गप्पा' या सदरामध्ये चर्चा करण्यासाठी आकाशवाणी नाशिकचे संचालक शैलेश माळोदे. संवाद साधलाय देशदूत डिजिटलचे दिनेश सोनवणे यांनी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com