'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी पोलिसांकडून वाहतुकीचे विशेष नियोजन

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी पोलिसांकडून वाहतुकीचे विशेष नियोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येत्या शनिवारी (दि.15) नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखेच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

गंगापूररोड येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी येणार्‍या बसेस व चारचाकी व दुचाकी वाहनांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारसह अनेक मंत्री येणार असल्याने नाशिक शहरात सुमारे 500 एसटी बसेस 100 सिटी बसेस तसेच 2000 चारचाकी वाहने असे कार्यक्रमासाठी येणार असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहनांची गर्दी होूऊन वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होईल तसेच वाहतूक कोंडीची समस्या उदभवू शकते.

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी व सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी नाशिक शहरात बसेस व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.कार्यक्रमाच्या दिवशी पहाटे सहा वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद राहिल, त्यावेळी या मार्गाने गंगापूररोडकडून अशोकस्तंभाकडे जाणारी वाहतूक ही जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, आ. फरांदे यांच्या बंगल्यासमोरील रस्त्याने मॅरेथॉन चौक मार्गे अशोकस्तंभ मार्गे जाता येणार आहे. अशोकस्तंभाकडून येणारी वाहने मॅरेथॉन चौक डावीकडे वळून जुनी पंडीत कॉलनी मार्गे राणे डेअरीकडे जातील. गंगापूररोडकडे जाणारी वाहने कॅनडा कॉर्नर कॉलेजरोड मार्गे जातील.

बसेस पार्किंग ठिकाणे

1) ईदगाह मैदान त्रंबक रोड, नाशिक

2) श्रध्दा लॉन्स, कोशिरे मळा, नाशिक

3) कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट पेठरोड, नाशिक

चारचाकी वाहन पार्किंग ठिकाणे

1) के. टी. एच. एम. कॉलेज, गंगापूररोड

2) बी. वाय. के. कॉलेज, कॉलेजरोड

दुचाकी वाहन पार्किंग ठिकाणे

1) रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड

2) बी. वाय. के. कॉलेज, कॉलेजरोड

बॅरीकेटींग पॉईंट

1) मॅरेथॉन चौक गंगापूररोड

2) चोपडा लॉन्स आ. फरांदे यांच्या बंगल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर

3) आहिरराव फोटो स्टुडीओ कॅनडा कॉर्नर

4) ठक्कर बंगला पंडित कॉलनी

प्रवेश बंद मार्ग

1) मॅरेथॉन चौक ते गंगापूर नाका सिग्नल

2) गोल्डन जिम ते ठक्कर बंगला

3) जुना गंगापूर नाका सिग्नल ते आहिरराव फोटो स्टुडीओ

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com